श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवारी दोघांचा कोरोनामूळे मृत्यू


श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवारी दोघांचा कोरोनामूळे मृत्यू

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२१: श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवारी दोघांचा कोरोनामूळे मृत्यू झाला. तर गुरुवार दि.२० रोजी सायं. उशिरा देवदैठण येथील ८० वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झाला. दि.२१ रोजी काष्टी येथील दोन जणांचा मृत्यू झाला. त्यातील ६० वर्षाचा रुग्ण दौंड येथे उपचार घेत होता तर ७५ वर्षीय रुग्ण श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू पावला.त्यामुळे तालुक्यातील बळींची संख्या १९ वर पोहीचली आहे.

         शुक्रवारी ६७ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात १४ जण पॉझिटिव्ह सापडले. एकूण संक्रमितांची संख्या ६१८ झाली आहे. १९ जण बरे होऊन घरी परतले. एकूण कोरोनामुक्त ५३० झाले आहेत.सद्यस्थितीतीला ४८ जण श्रीगोंदा येथे कोविड केंद्रात उपचार घेत आहेत.

            शुक्रवारी श्रीगोंदा शहरात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बालाजीनगर-३ मखरेवाडी-१,गुळवे कॉलेज परिसर-१ तर ग्रामीण भागात मढेवडगाव-२,काष्टी-३, मांडवगण-१,आनंदवाडी-१,पेडगाव-१, हंगेवाडी-१ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले.अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

   मढेवडगाव येथील प्रसिद्ध होलसेल व्यापारी पुणे, कोल्हापूर, नगर व तालुक्यात  व्यापरा निमित्त रोज फिरतीवर होता त्यांचा खूप ठिकाणी किरकोळ दुकानदारांशी संपर्क आल्याने बऱ्याच जणांचे धाबे दणाणले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News