श्रीगोंदा तालुक्यात कपाशीवर आढळली शेंदरी बोंडअळी: कृषी विभागाकडून रेड अलर्ट.


श्रीगोंदा तालुक्यात कपाशीवर आढळली शेंदरी बोंडअळी: कृषी विभागाकडून रेड अलर्ट.

                  🌻बांधावरची शेती शाळा🌻

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा कृषि विभागाकडून क्रॉपसॅप या प्रकल्पांतर्गत खरीप पिकावरील किड व रोगांचे नियमित सर्वेक्षण केले जाते. व त्यातील निरिक्षणाच्या अनुषंगाने कृषि विद्यापिठातील तज्ञांकडून सल्ला दिला जातो.श्रीगोंदा तालुक्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली आहे.त्यामुळे सुमारे २८०० हेक्टर वरील कपाशीचे पिक चांगले तरारुन आले आहे.मात्र गेल्या दोन दिवसांत क्रॉपसॅप अंतर्गत घेण्यात आलेल्या निरिक्षणात पारगाव येथे कृषि विभागाला शेंदरी बोंडअळीचे पतंग

आढळून आले. आढळून आलेली बोंडअळीची पातळी आर्थिक नुकसानीच्या पातळीवर असल्याने कृषि  विभागाकडून रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे.

        पारगाव येथील राजु सोपाना बोरुडे यांच्या कापूस पिकात कामगंध सापळे लावलेले आहेत. दि.१८ रोजी सापळयाच्या निरीक्षणात गुलाबी बोंड अळीचे एका कामगंध सापळयात ५ ते ६ पतंग आढळून आले आहेत.कपाशी पिक बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.गतवर्षी शेतक-यांनी फरदड घेतल्याने यंदाच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरवाती पासूनच कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे.गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी सद्यस्थितीत शेतामध्ये कामगंध सापळे लावून मोठयाप्रमाणात पतंग पकडून नष्ट करावेत. शिवार फेरी करुन डोमकळया अळीसहीत नष्ट कराव्यात.प्रादुर्भाव ग्रस्त गळालेली बोंडे जमा करुन नष्ट करावीत.

कामगंध सापळयामध्ये पतंग आढळल्यास जैविक किटकनाशके ५ टक्के निंबोळी अर्क किंवा बिव्हेरीया बॅसीवाना (जैविक किडनाशक) (१.१५ टक्के डब्लु.पी) ५ ग्रॅम ची फवारणी करावी. तसेच रासायनिक किटकनाशके इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के डब्लूजी किंवा स्पिनोटोरम ११.७ टक्के एससी.ची फवारणी करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी पद्मनाभ मस्के यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News