गांडूळ शेतकऱ्याचा मित्र कसा? बांधावरची शेतीशाळा सदरात.


गांडूळ शेतकऱ्याचा मित्र कसा? बांधावरची शेतीशाळा सदरात.

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

                  🌻बांधावरची शेतीशाळा.🌻

नमस्कार मित्रांनो

दिवसेंदिवस जमिनीमधील जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत आहे अशा परिस्थितीमध्ये क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी सेंद्रियजावुन शेतीकडे उपयुक्त जिवाणूंची संख्या राखणे गरजेचे आहे अशावेळी बहुतांश शेतकरी शेणखतकोंबडी खत इतर खाते सेंद्रिय खते कंपोस्ट खत आज शेतीमध्ये वापरताना दिसत आहे जमिनीचा आरोग्य राखण्यासाठी या खतांबरोबरच गांडूळ खत याला विशेष महत्त्व आहे म्हणून आजच्या शेतीशाळासदरमध्ये गांडूळ खताचे फायदे जीवनक्रम याबाबतची माहिती आपण पाहत आहोत गांडूळ शेतकरी चा मित्र का म्हणतात या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत       

                         १)गांडूळाचे महत्व -गांडुळाच्या पोटामध्ये प्रचंड शक्ती असते. त्याला भूक लागली की, काही तरी खावेसे वाटते,परंतु काय खावे आणि काय खाऊ नये, याची निवड त्याला करता येत नाही कारण त्याला डोळे नसतात. त्यामुळे ज्याचा स्पर्श होईल त्याला ते खात सुटते.जमिनीच्या आत बिळे करून राहण्याची त्याची प्रवृत्ती असते.ती माती त्याची भूक भागवायला उपयोगी नसते.परंतु टनभर माती खाल्ल्यानंतर त्याची भूक भागण्यास आवश्यक असे थोडे बहुत द्रव्य त्याला त्या मातीतून खायला मिळते.

निसर्गाने त्याच्या पोटामध्ये ती माती पचवण्याची शक्ती निर्माण केलेली आहे.या निमित्ताने गांडुळ २४ तास वळवळ करत राहते आणि माती उकरून खाते.

त्यामुळे शेतातली जमीन भुसभुशीत होते.अन्यथा हे काम करायला शेकडो रुपये देऊन ट्रॅक्टर तरी आणावा लागतो, किंवा सहा बैली नांगराने शेत नांगरावे लागते.तेच काम गांडुळ करत असल्यामुळे जमीन आयतीच भुसभुशीत होऊन तिच्यातून हवा खेळणे शक्य होते.

ज्या जमिनीत भरपूर हवा खेळते त्या जमिनीतल्या पिकांच्या मुळांनाहवाभरपूरमिळते.पिकांच्या मुळाशी पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्याही वाढते.त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते हे सारे करत असताना जमिनीतील माती गांडुळाच्या पोटातून काही प्रक्रिया होऊन विष्ठेच्या रूपाने पुन्हा बाहेर पडते आणि आयतेच खत जमिनीला मिळते.विष्ठेच्या बरोबरच गांडुळाच्या शरीरातून म्हणजे त्वचेतून काही द्रव्ये बाहेर पडत असतात. या द्रव्यांचा उपयोग पिकांची वाढ करण्यासाठी ग्रोथ प्रमोटर म्हणून होत असतो.गांडुळाच्या विष्ठेमध्ये सभोवतालच्या मातीच्या तुलनेत नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे प्रमाण पाच पट जास्त असते.त्याच्या विष्ठेत स्फूरद सात पटीने जास्त तर पालाश अकरा पटीने जास्त असतो.मुक्त चुनांश, मॅगनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा दुपटीने जास्त असतात.गांडुळांची जन्म-मरणाची साखळी सुरू असते.शेकडो पिलांना जन्म देऊन एखादे गांडुळ मरण पावते तेव्हा सुद्धा ते शेतकर्‍यांच्या उपयोगी पडते.

गांडुळाच्या शरीराचा सुद्धा खत म्हणून उत्तम उपयोग होत असतोत्याच्या मृत शरीराच्या वजनाच्या ७२ टक्के इतके प्रोटिन्स किंवा प्रथिने असतात. त्याचे शरीर लवकर कुजते आणि त्यातून जमिनीला नत्राचा पुरवठा होतोसर्वसाधारणपणे मेलेल्या एका गांडुळापासून दहा मिलीग्रॅम नायट्रेट मिळते.

गांडुळ खत म्हणजे प्रामुख्याने गांडुळाची विष्ठा.

या विष्ठेचे विश्‍लेषण केले असता  त्यामध्ये नत्र पालाश आणि स्फूरद हे तर जास्त असल्याचे आढळले आहेच. परंतु त्यात इतरही काही गोष्टी आढळलेल्या आहेत. जमिनीमध्ये सर्वसाधारणत: जेवढे जीवाणू असतात त्याच्या दहा ते पंधरा पट अधिक जीवाणू त्याच्या विष्ठेमध्ये असतात.

तिच्यामध्ये पिकांना उपयुक्त असलेली बुरशी आणि ऍक्टीनोमायसिटीस् असतात.

हवेतला नत्र जमिनीत स्थिर करणारे ऍझोटोबॅक्टर सारखे जीवाणूही गांडुळाच्या विष्ठेमध्ये मोठ्या संख्येने आढळतात.

 त्याच्या विष्ठेमध्ये असलेले नेकार्डिया ऍक्टीनोमासिटस् किंवा स्ट्रेप्सोमायसेस यासारखे सूक्ष्म जीवाणू औषधासारखे काम करतात आणि पिकांवर पडणार्‍या रोगांवर इलाज करतात. गांडुळाचे आतडे हे एक यंत्रच आहे.त्याच्या आतड्यामध्ये मातीचे रुपांतर खतात करणारे शंभरहून अधिक जीवाणू सतत कार्यरत असतात.

गांडुळाचे हे सारे गुणधर्म पाहिले म्हणजे गांडुळ हा शेतकर्‍यांचा कसा मित्र आहे हे लक्षात येईल

पुढील भागात आपण गांडुळ संवर्धन तसेच गांडुळ खत निर्मितीबद्द्लची माहीती घेणार आहेत

               धन्यवाद !

सहकार्य _ निलेश बिबवे

शेतीशाळा प्रशिक्षक, कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग कोपरगावजाहिरात
Search
विडिओ
Recent News