योगी सरकारच्या दडपशाही विरोधात राष्ट्रपतींना भेटणार.....विजय अंबोरे


योगी सरकारच्या दडपशाही विरोधात राष्ट्रपतींना भेटणार.....विजय अंबोरे

विट्ठल होले पुणे

सत्यमेव जयते यांच्या हत्येची चौकशी निवृत्त न्यायाधिशांच्या समितीने करावी.....ॲड. क्षितीज गायकवाड

पिंपरी (दि. 21 ऑगस्ट 2020) उत्तर प्रदेशात मागसवर्गीयांवर अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये 47 टक्के वाढ झाली आहे. या विरोधात लोकशाही पध्दतीने आवाज उठविणा-यांवर योगी सरकार दडपशाही करीत आहे. भाजप प्रणित सरकार असणा-या इतर राज्यांमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. या विषयी लवकरच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंबोरे यांनी केली.

    उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील बासा गावचे सरपंच सत्यमेव जयते यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत गुरुवारी (दि. 20 ऑगस्ट) आझमगढ येथे गेले असता त्यांना उत्तर प्रदेश पोलीसांनी अटक केली. या हत्येच्या घटनेचा निषेध व उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या निषेध करण्यासाठी आज शुक्रवारी (दि. 21 ऑगस्ट) दापोडी येथील हुतात्म सरदार भगतसिंह यांच्या पुतळ्यासमोर कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त शहराध्यक्ष अॅड. क्षितीज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी हिरामण खवळे, सौरभ शिंदे, तेजस पाटील, मयुर तिखे, सार्थक रानवडे, प्रथमेश कुंभार, अविनाश मेश्राम, संकेत कासुले, गंगाधर सुतार आदी उपस्थित होते.

      कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त शहराध्यक्ष ॲड. क्षितीज गायकवाड यांनी देखील बासा गावचे सरपंच सत्यमेव जयते यांच्या हत्येचा निषेध केला. तसेच सरपंच सत्यमेव जयते यांच्या हत्येची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या समितीने करावी अशी मागणी केली. तसेच मागासवर्गीय समाजाच्या संविधानीक न्याय, हक्कांचे संरक्षण करण्यात योगी सरकार अपयशी ठरले आहे. केंद्रातील मोदी सरकार योगी सरकारला या विषयी पाठीशी घालत आहे. मागासवर्गीय समाजावर केलेल्या या दडपशाहीच्या विरोधातील राग आगामी निवडणूकीत मतपेटीव्दारे बाहेर पडेल, असेही ॲड. क्षितीज गायकवाड म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News