निरा येथे एक गाव एक गणपती २५ हजार लोसंख्या आसणारे गाव।


निरा येथे एक गाव एक गणपती २५ हजार लोसंख्या आसणारे गाव।

 सासवड  :( प्रतिनिधी) राजश्री बनकर

        पुरंदर तालुक्यातीलच नव्हेतर पुणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निरा गावातील गणेश भक्तांनी गुरवारी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांनी, व ग्रामपंचायत प्रशासनाने एकत्रीत येत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेत प्रशासनाला सहकार्य केले. जेजुरी पोलीसांनी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत, दोन दिवस युवकांशी चर्चा केल्यानंतर वर्गणी न गोळा करता प्रतिकत्मक गणेशोत्सव साजरा करत एक गाव एक गणपती बसवण्याचे ठरवले.

 

  

      २५ हजार लोकसंख्या असलेल्या पुणे जिल्ह्याचे व पुरंदर तालुक्याचे शेवटचे टोक निरा गावात आज ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे तसेच बारा बलुतेदार व अठरापगड जातींच्या निरा गावात सुमारे ४५ लहाण मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मंगळवारी जेजुरी व निरा पोलीसांनी गणेशोत्सवानिमित्त बैठक बोलावली होती. कोरोना संसर्गाच्या शक्यतेने  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना काही सुचेना देण्यात आल्या. राज्य शासनाने काही निर्बंध लादले आहेत, ते तंतोतंत पालन करावे लागतील असे जेजुरीच्या पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले. काही त्रुटी जाणवल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. त्यापेक्षा महाराष्ट्र शासनाची‌ महत्त्वाकांक्षी योजना असलेली एक गाव एक गणपती ही योजना राबवावी असे सुचवले. याला निरेतील प्रमुख ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय शिंदे, सदस्य अनिल चव्हाण, बाळासाहेब भोसले, माजी सरपंच राजेश काकडे, नीरा विकास आघाडीचे प्रमुख शामराजे कुंभार, दयानंद चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवसांची मुदत घेतली. दोन दिवसात दोन्ही गटांच्या राज्यकर्त्यांनी सहा ही प्रभागातील सुमारे वीस मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांशी चर्चा केली. सर्व मंडळाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गुरवारी निरा ग्रामपंचायतीच्या सभागृहात आपले निर्णय सांगितले. 


        यावेळी वॉर्ड नं.१ अष्टविनायक मंडळ - सागर बागडे, स्वराज मंडळ - सचिन बरकडे, वॉर्ड नं. २ शिवाजी तरुण मंडळ - मंगेश ढमाळ, शिवाजी गडदरे, शिवतेज मंडळ - अनिल सूर्यवंशी, त्रिमूर्ती मंडळ - उमेश तिकोने, वॉर्ड नं.३ सार्वजनिक मंडळ - दीपक जाधव, जयभवानी जीवनदीप मंडळ - राजू आगवणे, वॉर्ड नं.४ कानिफनाथ मंडळ - अनिल धोत्रे , शिवगणेश मंडळ - अनिकेत सोनावणे, वॉर्ड न.५ भैरवनाथ मंडळ - गणपत लकडे, बंडगर वस्ती रणवीर खरात ,वॉर्ड नं. ६ बुवासहेब मंडळ दीपक काकडे भैरवनाथ मंडळ संतोष मोहिते यांनसह ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय शिंदे, माजी सरपंच राजेश काकडे, सदस्य अनिल चव्हाण,गणपत लकडे, दिपक काकडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे, पत्रकार राहुल शिंदे, भरत निगडे आदी उपस्थित होते. 


      ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्व गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुख सदस्यांची बैठक घेऊन कोरोना विषयी सावधानता बाळगत सोशल डिस्टंसिंग व इतर उपाययोजना करण्यात संदर्भात चर्चा करत असताना, एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचा विचार येताच सर्व गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांनी होकार दिला. मात्र खंड पडु नये व गणेश मुर्ती बुकिंग केली असल्याने एकाच ठिकाणी सर्व गणेशमुर्ती ठेवत उत्सव साधल्या पद्धतीने साजरा करण्यात यावा असे सुचवले. त्याला अनिल चव्हाण व राजेश काकडे यांनी निरा पोलीस दुरक्षेत्राच्या आवारात मंडप करुन सर्व गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांनी ठरलेल्या दिवशी व वेळेत आरती करत त्याठिकाणी थांबण्याचे ठरले. या निर्णयाचे निरा परिसरासह पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News