संजीवनी युवा प्रतिष्ठानचा वतीने कुंभारीत ग्रामसेवकांचा सत्कार !!


संजीवनी युवा प्रतिष्ठानचा वतीने कुंभारीत ग्रामसेवकांचा सत्कार !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यांतील कुंभारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कुंभारी येथुन राहुरी तालुक्यात बदली झालेले ग्रामसेवक संजय डौले साहेब व त्या जागी हजर झालेले नुतन ग्रामसेवक कासवे साहेब यांचा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कुंभारीनं१ वि.वि. कार्यकारी सोसायटीचे संचालक सुनिल कदम,भाजपा गट प्रमुख प्रमोद चिने व उत्तम कदम,राजेंद्र बढे, सागर घुले,राजेंद्र तासकर, कचेश्वर माळी,गुलाब मोरे यांचा सह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्त उपस्थित होते. या वेळी बोलताना सुनिल कदम म्हणाले कि ग्रामसेवक डौले साहेबांनी कुंभारी गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असुन कोरोना महामारीचा काळात दक्षता समितीच्या सदस्यांना बरोबर घेउन गावातील नागरीकांच्या आरोग्याची काळ घेत जंतुनाशक औषधांची फवारणी.कोरोना विषयीची जनजागृती, लॉककडाउनच्या काळात बाहेरून आलेल्या नागरीकांचे विलगीकरन तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्या कामी अनेक उपाययोजना केल्या. त्या कामाची पावती म्हणुन स्वातंत्रदिनाच्या छोटेखानी कार्यक्रमात कोरोना योध्दा म्हणुन त्यांचा सत्कार हि करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

कार्यक्रमात शेवटी सत्कारमुर्ती संजय डौल साहेब व कासवे साहेब यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News