खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटादार वर्ग-१ करा -आमदार आशुतोष काळे


खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटादार वर्ग-१ करा  -आमदार आशुतोष काळे

भोगवटादार वर्ग-२ रद्द करून भोगवटादार वर्ग-१ ची नोंद करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांन देतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

                      कोपरगाव विधानसभा तदार संघातील खंडकरी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या शेतजमिनीचे खंडकरी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनींचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहीत (७/१२) भुधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-२ रद्द करून भोगवटादार वर्ग-१ ची नोंद करण्यात यावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली असून नुकतेच अशा आशयाचे निवेदन त्यांनी महसूल मंत्र्यांना दिले आहे.

                    खंडकरी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनींचे अधिकार अभिलेख आणि नोंदवहीत (७/१२) भुधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-२ रद्द करून भोगवटादार वर्ग-१ ची नोंद करण्यात यावी अशी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील खंडकरी शेतकऱ्यांची मागील काही वर्षापासूनची मागणी होती मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. याबाबत या खंडकरी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधी मार्फत आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने दखल घेवून महसूल मंत्र्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.

           दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ अन्वये औद्योगिक उपक्रमांचे अतिरिक्त घोषित झालेल्या जमिनी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची स्थापना करून तात्पुरत्या व्यवस्थापनेसाठी वर्ग केल्या होत्या मात्र सन १९७० मध्ये सदरच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून महामंडळाच्या ताब्यात असलेल्या व अतिरिक्त घोषित झालेल्या जमिनी दि. १३/८/१९७० रोजी कायमस्वरूपी शेती महामंडळाकडे भोगवटा मूल्यावर वर्ग केलेल्या आहेत.अधिनियम १९६१ ची पुन्हा २००३ मध्ये दुरुस्ती करून औद्योगिक उपक्रमाचे माजी खंडकऱ्यांना एक कमाल मर्यादेपर्यंत जमीन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे औद्योगिक उपक्रमांचे माजी खंडकऱ्यांना किंवा त्यांचे कायदेशीर वारसांना वाटप करण्यासाठी लागणारे गाववार जमिनींच्या क्षेत्रांचे आदेश शासनाने वेळोवेळी निर्गमित करून त्यानुसार खंडकऱ्यांना सदर जमिनी भोगवटादार वर्ग-२ म्हणून स्व-कसवीण्यासाठी वाटप करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे.

           जर मुळ मालकांनी औद्योगिक उपक्रमांना त्यांची जमीन दिली नसती तर त्यांना कमालधारणेपर्यंत त्यांचेकडील जमीन त्या भोगवटावर्गाची होती त्या भोगवटा वर्गाची राहिली असती. आता मूळ मालकांना किंवा त्यांचे वारसांना पात्र खंडकरी म्हणून परत केलेली जमीन पूर्वी ज्या भोगवटा वर्गाची होती त्याच भोगवटा वर्गाची नोंद घेणे आवश्यक होते. तशी मागणी देखील सन २०१२ मध्ये खंडकरी शेतकऱ्यांनी शासनाकडे केलेली होती. नोंदवहीत भोगवटादार वर्ग-२ ची नोंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळत नाही. कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री,वारस नोंद, कौटुंबिक हक्क सोडपत्र करता येत नाही. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेता येत नाही. तसेच न्यायालयाकडे देखील सदर जमिनीचे दस्तावेज जामिनकीसाठी स्वीकारले जात नाही. जमीन असूनही शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबासाठी विनियोग होत नाही. सदरच्या जमिनी ह्या मूळ खंडकरी शेतकऱ्यांच्या मालकीच्या असून त्या जमिनी शासनाकडून किंवा अन्य कोणाकडून मिळालेल्या नाहीत. खंडकरी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी मिळविण्यासाठी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. जमिनी मिळूनही शेतकऱ्यांचे कुटुंबियांना आवश्यक तो फायदा होत नसल्यामुळे या शेतकऱ्यांची महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहीत (७/१२) भुधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-२ रद्द करून भोगवटादार वर्ग-१ ची म्हणून तातडीने नोंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून लवकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन आमदार आशुतोष काळे यांना दिले आहे.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News