श्रीगोंदा तालुक्यात विसापूर फाट्यावर पूर्ववैमनस्यातून चौघांचा खून.


श्रीगोंदा तालुक्यात विसापूर फाट्यावर पूर्ववैमनस्यातून चौघांचा खून.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२०: श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे आदिवासी समाजाच्या ४ तरुणांचा मागील दुष्मणी तून  झालेल्या भांडणातून खून होऊन यात नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील लिंब्या हब्र्या काळे वय २२, तर सूरेगाव येथील नातीक कुंजा चव्हाण ४० वर्ष, नागेश कूंजा चव्हाण १४ वर्ष, श्रीधर कूंजा चव्हाण ३५ या चौघांचा जागीच मृत्यू झाला.

          बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळे जण  विसापूर फाटा येथे गांजा आणण्यासाठी गेले असता सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात मारामारी होऊन झालेल्या मारामारीत चौघे जण जागीच ठार झाले. मयत झाल्याची माहिती कुंजा चव्हाण यांच्या घरच्यांना माहीत झाल्यानंतर यातील तिघांना सुरेगाव येथील पालावर घेऊन आले तर लिंब्या हाब्र्या काळे याला विसापूर फाटा येथेच सोडून दिले. घटनेची माहिती संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उप निरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असल्याची प्राथमिक माहिती दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News