शिर्डी,प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे
आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत महसूलमंत्री मा.ना.श्री. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदन दिले. खंडकरी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहीत (७/१२) भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग २ रद्द करून भोगवटादार वर्ग १ ची नोंद करण्यात यावी अशी मागणी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी महसूलमंत्री मा.ना.श्री. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.