७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सायकलींग क्लबच्या सदस्यांनी केला ७४ किलोमीटर प्रवास


७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सायकलींग क्लबच्या सदस्यांनी केला ७४ किलोमीटर प्रवास

वरवंड(प्रतिनिधी):- देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स,मेडिकल व्यवसायिक जवान,आशा स्वयंसेविका,सफाई कामगार, व आपल्या देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा ठरलेल्या बळीराजा या काळात योद्धे ठरले आहेत.
    त्यांचा आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वरवंड गावातील ट्रेकर्स आणि सायकल क्लब च्या ८ सदस्यांनी वरवंड ते कापूरहोळ(भुलेश्वर घाट मार्गे) असा एकूण ७४ किलोमीटर चा सायकल प्रवासपूर्णकेला.यादरम्यान सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत सुरु असलेला पाऊस चढण असलेला रस्ता उलट्या दिशेने वाहणारे वारे;व सासवड पासून कापूरहोळ पर्यंत रस्त्यावर असलेले मोठे खड्डे असलेला; रस्ता अशा कठीण आणि आव्हानात्मक व शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या परिस्थितीत अननुभवी असणाऱ्या सदस्यांनी हे अंतर साधारण ५ तासांमध्ये पूर्ण केले.
      ही त्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब ठरली आहे. यादरम्यान क्लब मधील एका सदस्याच्या सायकलचा  सासवड मध्ये झालेला घोटाळा झाला होता. शनिवारी रविवारी सासवड शहर कोरोना मुळे बंद असतानाही; दुकान उघडून मदत करणाऱ्या त्या देवासमान असणाऱ्या दुकांनदारामुळे जगात अजूनही; माणुसकी जपणारे लोकं आहेत याची जाणीव झाली.क्लब मधील एका सदस्याची बहीण रूपाली कदम व भाची समृद्धी कदम सासवड मध्ये राहत असल्यामुळे त्या सदस्याने त्याच्या बहिणीला याची पूर्व कल्पना दिली होती.
     त्यांनी सकाळी ८ वाजता सायकल च्या आकाराचा केक बनविला होता.यामुळे या प्रवासाचा सर्वांचा उत्साह आणखी वाढवला.या मोहिमेची सुरुवात वरवंड गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली;व  सांगता पण राजगड सहकारी साखर कारखान्याच्या आवारात असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या समोर झाली.
      कोरोनाच्या काळात तरुण वर्गाकडून विधायक उपक्रम राबविले; जात असताना वरवंड ट्रेकर्स अँड सायकल क्लब च्या सदस्यांनी राबविलेल्या या आगळ्या वेगळ्या स्तुत्य उपक्रमा बद्दल;गावातील तसेच परिसरातील व्यक्तींनी क्लब च्या सदस्यांचे कौतुक केले जात आहे.या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची परिसरामध्ये चर्चा सुरू आहे.
     यावेळी सायकल क्लब मधील गणेश दिवेकर,अमोल दिवेकर,गणेश दिवेकर,सागर धुमाळ,अक्षय,जगताप, विशाल चादगुडे,आकाश पवार, आशितोष सुपेकर,वैभव सरनोत यांनी या सायकलींग मध्ये सहभाग घेतला होता. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News