यंदाचा गणेशोत्सव गर्दी न करता साधेपणाने साजरा करा- बापूसाहेब मत्रे


यंदाचा गणेशोत्सव गर्दी न करता साधेपणाने  साजरा करा- बापूसाहेब मत्रे

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील पळशी याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा एक गाव एक गणपती बसविण्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे लोणी भापकर बिट ठाणे अंमलदार बापूसाहेब मत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत पळशी येथे दि.१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिटिंग आयोजित केली होती. या मिटिंगमध्ये पळशी व वाड्यावस्त्यावरील गणपती मंडळांच्या पदाधिकार्यांना काही सुचना देण्यात आल्या. 

    यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं जारी केल्या आहेत. त्यानुसार घरगुती गणपतीची मूर्ती दोन फुटांची तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती चार फुटांपेक्षा मोठी नसावी असे बंधन घालण्यात आले आहे. गर्दीमुळं होणारा संसर्ग टाळण्यासाठी विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून घेण्याच्या सूचना गणेशभक्तांना करण्यात आल्या आहेत. रजिस्ट्रेशन नसणाऱ्या मंडळाना गणपतीची मुर्ती बसवण्यास परवानगी नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक परवानग्या ऑनलाईन घेणे गरजेचे आहे. तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही याचीही ही नोंद मंडळांनी घ्यावी अशी माहिती यावेळी मत्रे यांनी दिली.

       यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस ए.एन.भुजबळ, पोलीस पाटील भालचंद्र भोसले, सरपंच बाबासाहेब चोरमले, ग्रामपंचायत सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक सरपंच बाबासाहेब चोरमले यांनी तर आभार पत्रकार काशिनाथ पिंगळे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News