2019 च्या भरतीतील व अनुकंप तत्वावरील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा...


2019 च्या भरतीतील व अनुकंप तत्वावरील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा...

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या सततच्या पाठपुराव्याला यश...

शिर्डी,प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे

२०१९  च्या  सरळ सेवा भरती प्रक्रियेतील  कर्मचाऱ्यांच्या सेवा स्थगितीचा प्रशासनाचा निर्णय रद्द करण्याचे अखेर  परिवहन मंत्री मा ना ॲड अनिल परब साहेब यांनी एसटी प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यामुळे  दुष्काळग्रस्त भागातील २०१९ च्या सरळ सेवा भरतीतील नविन रुजू झालेले एसटी  कर्मचारी व अनुकंप तत्वावर नेमणूक देण्यात आलेले कर्मचारी यांची सेवा पुर्ववत होणार आहे.अशी माहिती विभागीय अहमदनगर जिल्हा प्रमुख सल्लागार  राजेंद्र वाघमारे यांनी दिली. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने २०१९ च्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचा-यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला होता.  महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस मा हिरेनजी रेडकर साहेब यांनी परिवहन मंत्री तथा अध्यक्ष एसटी महामंडळ मा. ना. ॲड अनिल परब साहेब यांना पत्राद्वारे स्थगिती उठविण्याची मागणी करुन अनेक वेळा पाठपुरावा केला होता. परिवहन मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देवुन सुद्धा एसटी प्रशासन मात्र  स्थगिती उठविण्याबाबत च्या परिपत्रकीय सुचना प्रसारित करण्यात दिरंगाई करत असल्याने अखेर  दि. १६/८/२०२० रोजी सरचिटणीस मा हिरेनजी रेडकर साहेब यांनी परिवहन मंत्री महोदयांची भेट घेऊन आग्रह करताच परिवहन मंत्री महोदयांनी एसटी प्रशासनाला तत्काळ स्थगिती उठविण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज दिवसभर मध्यवर्ती कार्यालयात हालचालींना वेग आला असुन लवकरच या कर्मचा-यांची सेवा पुर्ववत बहाल होणार आहे. त्याबाबतच्या परिपत्रक सुचना मध्यवर्ती कार्यालयाकडुन संबंधित विभागांना येत्या दोन दिवसातच देण्यात येणार आहे  या साठी केलेल्या  कामगार सेना राज्य सरचिटणीस मा, हिरेनजी रेडकर साहेब,राज्य उपाध्यक्ष किरण भाऊ बिडवे, अहमदनगर जिल्हा सचिव नितीन येणे ,विभागीय उपाध्यक्ष सुमित बिडवे प्रमुख मार्गदर्शक सनी गुंजाळ, डेपो अध्यक्ष भरत  मोरे, कार्य अध्यक्ष सनी शिवाजी राजे dahaanke,  डेपो सचिव अनिल भाभड ,यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News