शेवगांवचे भूमिअभिलेख (सिटीसर्वे) कार्यालयात घाणीचे साम्राज्य कर्मचारी आणि नागरिकांना त्रास


शेवगांवचे भूमिअभिलेख (सिटीसर्वे) कार्यालयात घाणीचे साम्राज्य कर्मचारी आणि नागरिकांना त्रास

प्रतिनिधी सज्जाद पठाण शेवगांव

 शहराच्या जुनाप्रेस भागात खडकावर  असलेले तालुका भूमी अभिलेख काकार्यलय शहरातील आणि तालुक्यातील शेती बिनशेती खासगी जागा व्यापारी जागा विविध नोंदी स्कीम चे उतारे चतुसीमा गटमोजणी  बांधकाम परवानगी आदी कामे घेऊन शेवगांव शहरातील आणि तालुक्यातील नागरिक सतत कार्यालयात येत असतात कार्यालयात परिसरात आणि रस्त्यावर प्रचंड घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी वास येत आहे कार्यालयासमोरच पडके बाधकाम आणि शाशकीय गोडाऊन आहे तेथे साचलेले डबके त्यातील घाण पाणी यांचा कार्यालयातील कर्मचारी आणि  काम घेऊन  येणारे नागरिक यांना  त्रास सहन करावा लागतो तरी याची दाखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांची  नियुक्ती करून नियमित साफसफाई  व स्वछता ठेवणे अपेक्षित आहे या कार्यलय परिसरात व समोरच्या भागात कायमच दलदल साचलेली  असते त्याचा कायमचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे नगरपरिषद च्या सफाई कामगारांचे मुख्यालय हाकेच्या अंतरावर असून सुद्धा साफसफाई होत नाही

जाहिरात
Search
विडिओ
Recent News