नगर (प्रतिनिधी संजय सावंत) - लॉक डाऊन मार्च महिन्यापासून चालू असून सामान्य जनात आर्थिक संकटातून जात आहे. यात सामान्य नागरिक बरोबर आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी ही वाचले नाही. जग चालावे व आपले घरात दोन पैसे येतील या आशेने रुग्णालयात कर्मचारी कोरोना संकटात ही काम करीत आहे. प्रत्येक खासगीत काम करणार्या कर्मचार्यांना किमान रु. 10 लाखाचा आरोग्य विमा व एक करोडचा जीवन विमा त्या खासगी रुग्णालयाचे संचालक मंडळाने उतरून द्यावा; जेणे करून जरी त्या कर्मचार्याला आरोग्याचा त्रास झाला तर आरोग्य विम्यामुळे त्याला व त्याचे कुटुंबाला योग्य उपचार मिळतील. आणि जर तो दगावला तर कमीत कमी त्याचे कुटुंबाला विम्याची रक्कमेमुळे पुढचा जीवन चांगले जगता येईल, अशी मागणी एमआयएमच्यावतीने जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात एक नवीन कायदा तयार करावे की प्रत्येक रुग्णालयाने त्याचे इथे काम करणारे प्रत्येक कर्मचारी चे आरोग्य आणि जीवन विमा सखतीने उतरून घ्यावे सर्वांनी या नियमाचे पालन करावयास लावून जो करणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे त्यात प्रविधान असावे. निवेदनावर एम.आय.एम. जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, हाजी जावेद शेख (जिल्हा महासचिव), कदीर शेख (जिल्हा संपर्क प्रमुख), मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शाहनवाज तांबोळी (विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष), आसिफ सुलतान (नगरसेवक), फिरोज शेख (जिल्हा उपाध्यक्ष), सनाउल्लह तांबटकर (विद्यार्थी शहर अध्यक्ष), अमीर खान, आरिफ सय्यद आदीचे सह्या आहेत. सध्या पूर्ण देशात कोरोणा महामारी ने थैमान माजला आहे. भारत आणि महाराष्ट्र ही वाचलेले नाही. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे. रोज हजारो नागरिकांना कोरोणा ची लागण होते तर रोज हजारो नागरिक जगाला कोरोनामुळे निरोप देत आहे. या परिस्थितीत सरकारी रुग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयेही सेवा देत आहेत. परंतु या खाजगी रुग्णालयात काम करणारे कर्मचार्याला कोणताही आजार होतो आणि तो आजार त्या रुग्णालयात काम केल्याने होत असले तरी त्यांचा मालक एक दमडी मदत करण्यास तयार होत नाही. रुग्णालयाचे संचालक विसरतो किंवा विसरल्याचे नाटक करतो की संबंधित कर्मचारीला ही लागण आपल्या इथे काम केल्या मुळे झाली आहे आणि आपल्या जबाबदारी झटकतो. यात जर तो कर्मचारी दगावला तर त्यांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहचे काय असा प्रश्न निर्माण होतो, त्याच्या कुटुंबाने पुढे जगायचे कसे? राहायचे कुठे? खायचे काय? मुलांचे शिक्षणाचे कसे करायचे? असे अनेक प्रश्न एका कमावता घरचा व्यक्ती हरपल्याने निर्माण होतात असे प्रश्न एम.आय.एम. जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी उपस्थित केले. डॉ परवेज अशरफी पुढे म्हणाले की एक प्रकरण अहमदनगर येतील खासगी रुग्णालयात झाले. त्या खासगी रुग्णालयात काम करणारा 25 वर्षीय युवा डॉक्टरला रुग्ण तपासात असताना कोरोणा ची लागण झाली व त्या डॉक्टरची प्रकृती इतकी बिगडली की त्यांनी या जगातून निरोप घेतला. विशेष म्हणजे त्याला कोरोणा ची लागण होऊन मरण पावला तरी त्या रुग्णालयाने त्याची व त्याचे कुटुंबाची कोणती जबाबदारी घेतली नाही किंवा त्याचे कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत केली नाही. आज त्या डॉक्टरचे कुटुंबाची अवस्ता काय असेल घरातला एक कमवता तरुण मुलगा काम करत असताना गेला. जर त्या खासगी रुग्णालयांने आपले रुग्णालयात काम करणारे सर्वांचे जीवन विमा व आरोग्य विमा काळले असते तर त्या डॉक्टरचा उपचारही योग्य झाला असता आणि त्याचे नंतर जीवन विमामुळे त्याचे कुटुंबाला उधरणीर्वाह साठी काही रक्कम भेटली असती. परंतु असे काही झाले नाही कारण एकच की खासगी रुग्णालय कर्मचारी कडून काम तर भरपूर करून घेतात परंतु त्यांचे सुरक्षेचे कोणतेही कार्य करत नाही कारण खर्च त्यांना होईल,असे ही निवेदनात म्हटले आहे.