श्रीगोंदा तालुक्यात बुधवारी २५ रुग्ण संक्रमित


श्रीगोंदा तालुक्यात बुधवारी २५ रुग्ण संक्रमित

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी :दि.१९: श्रीगोंदा तालुक्यात बुधवार दि.१९ रोजी ६९ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात नवीन २५ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. तर १९ जण बरे होऊन घरी परतले. तालुक्यात एकूण रुग्णांचा आकडा ५७८ वर पोहोचला आहे.आजपर्यंत ४९६ कोरोनामुक्त झाले आहेत तर १६ जण मृत्युमुखी पडले आहेत.

         बुधवारी श्रीगोंदा शहरात ६ रुग्ण संक्रमित आढळले. त्यात कासारगल्लीतील एकाच कुटुंबातील ५ जण पॉझिटिव्ह आले. तर काळकाई चौकातील १ रुग्ण संक्रमित सापडला. ग्रामीण भागात दाणेवाडी-५, आनंदवाडी-१,बेलवंडी-२, ढवळगाव-१, म्हातारपिंप्री-२,चिखलठाणवाडी-१,जंगलेवाडी-१, एरंडोली-३, खेतमाळीसवाडी-२, पिंप्रीकोलंदर-१ रुग्ण संक्रमित सापडले. सद्यस्थितीला ५७ रुग्ण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत.त्यातील चिखलठाणवाडी येथील एक रुग्ण नगरला उपचार घेत आहे. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News