दौंड पोलीस ठाणे हद्दीतून गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 15 लोकांना पोलीस अधीक्षक यांनी केले तडीपार


दौंड पोलीस ठाणे हद्दीतून गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 15 लोकांना पोलीस अधीक्षक यांनी केले तडीपार

दौंड प्रतिनिधी --- दौंड पोलीस ठाणे अंतर्गत आता सर्व गुन्हेगारांचे क्राइम रेकॉर्ड अद्यावत करण्यात आले आहे,दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले की तात्काळ तडीपार कारवाई करण्यात येते  असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले, दौंड पोलीस ठाणे हद्दीतून पाठीमागील वर्षात जवळजवळ चाळीस लोकांना एक वर्षाकरता तडीपार करण्यात आलेले आहे 2020 मध्ये सुद्धा तडीपार प्रस्ताव रवाना झाले होते त्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक यांनी खालील 15 लोकांना  तडीपार केलेले आहे सदर लोकांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे म्हणजे मारामारी, जबरी चोरी, विनयभंग, दारूविक्री यासारखे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्हेगार परत विनापरवाना दौंड मध्ये दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल त्यानंतर याच लोकांच्या वर पुन्हा झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत किंवा संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येईल यापुढे प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांचे बारीक लक्ष असेल सदर कारवाई राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक  ऋषिकेश अधिकारी, पोलीस नाईक बोराडे, वारे, पोलीस शिपाई वलेकर, सहाय्यक पोलीस फौजदार भाकरे, पोलीस हवालदार शिंगाडे, पोलीस हवालदार आसिफ शेख, पांडुरंग थोरात, हिरवे, पोलीस शिपाई   गुंजाळ, वाघ, गाढवे,गवळी, अमोल देवकाते यांनी केली आहे*  

तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे खालील प्रमाणे *तडीपार इसम*

1. दीपक रमेश विधाते

2. पंकज दिलीप निमजे

3. जॉय सतीश नवगिरे

4. शाहिद मोहम्मद शेख

5. राहुल चन्नाप्पा कमप्लीकर

6. अजय हनुमंत चन्नूर

7. लिंगाप्पा अमात्य चूनुर

8. सोनू नामदेव शेटे

9. मनोज अण्णाराय नरळे

10. सुरज विजय  होसमाने

11. सागर अरुण कांबळे

12. लखन जीवन सरवय्या

13. सागर कैलास अल्लाट

14. सुशांत राजू कांबळे

15. विशाल प्रकाश काटकर अशा 15 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून अजूनही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी यावेळी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News