भारतीय मानवाधिकार परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी राजेंद्रसिंह वालिया यांची निवड


भारतीय मानवाधिकार परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी राजेंद्रसिंह वालिया यांची निवड

विट्ठल होले पुणे

पिंपरी (दि.19 ऑगस्ट 2020) पिंपरी चिंचवड मधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्‍पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया यांची भारतीय मानवाधिकार परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख यांनी 15 ऑगस्ट रोजी वालिया यांना नियुक्‍तीचे पत्र दिले. 2016 पासून राजेंद्रसिंह वालिया हे भारतीय मानवाधिकार परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. तसेच पंजाबी कला केंद्र, पुणेचे संस्थापक अध्यक्ष आणि  पिंपरी चिंचवड हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे खजिनदार म्हणूनही ते अनेक वर्षांपासून जबाबदारी सांभाळत आहेत. राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आणि राज्यातील इतर क्रिडा स्पर्धांच्या आयोजनात व सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News