कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात "एक गाव एक गणपती" निर्णय.


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात "एक गाव एक गणपती" निर्णय.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी दि १८: कोरोना महामारीच्या सुरु असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात व तालुक्यातील विविध गावांमध्ये "एक गाव एक गणपती" बसवून बाप्पा भक्तांनी संकटकाळी समजूतदार भूमिका घेऊन सार्वजनिक आरोग्य व महामारी विरोधात ठाम भूमिका घ्यावी असे मत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत मांडले.

>       यावेळी जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी श्रद्धाळू जनतेला विनंती केली की हे भयानक जागतिक संकट आले आहे आपण सर्वांनी या संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जायचे आहे. गणपती बाप्पा विषयी सर्वांना आदर व प्रेम आहे परंतु सामाजिक आरोग्य व पुढील पिढी सुरक्षित राहावी यासाठी एक गाव एक गणपती बसवण्याबाबत सर्वानी समाजहिताचा निर्णय घ्यावा.

> भोस यांच्या आवाहनाला  सर्व उपस्थितांनी मान्यता देत एक गाव एक गणपती बसवण्याचा निर्णय घेतला परंतु नगरसेवक शहाजी खेतमाळीस,प्रशांत गोरे यांनी जे मंडळ अनुपस्थित असतील त्यांना बोलावून परत बैठक घ्या असे सांगितले.

>     त्यावर सर्वांनीच निर्णय झालाय जे लोक विरोध करतील त्यांना समजावून सांगू असे सांगितले 

>       पोलीस निरीक्षक जाधव यांनी ज्या मंडळांना गणेशमूर्ती बसवायची त्यांनी चार लोकांपेक्षा जास्त लोक जमणार नाही याची काळजी घ्यावी.चार फुटापेक्षा जास्त उंचीची गणेशमूर्ती नसावी.फक्त चार लोकांनी आरती पूजा करावी.आगमन,विसर्जन मिरवणुकीवर बंदी राहील.गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रम बंद राहणार,.गणेश विसर्जन दोन किंवा तीन लोकांनीच करावे.चार लोकांपेक्षा जास्त लोक जर गणेश मंडळाजवळ दिसले तर गुन्हे दाखल करू अशा सूचना दिल्या.

>     तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.कुणाच्याही दबावाखाली नियम तोडणारांची हयगय केली जाणार नाही असे निक्षून सांगितले.

>      अजीज शेख यांनी मोहरम निमित्त शेख महंमद महाराज मंदिरात ताबूत बसवण्याची परवानगी मागितली असता जाधव यांनी सर्व मुस्लिम धर्मियांनी एकत्रित येऊन ताबुत बसवावा पण मिरवणूक काढू नये अशी सूचना केली.

>    शिवसेनेचे संतोष खेतमाळीस यांनी सर्व नियम अटींचे पालन करून शांततेत गणेशोत्सव पार पाडू अशी ग्वाही दिली.नगरसेवक मनोहर पोटे यांनी ज्या मंडळांना गणेशमूर्ती बसवायची आहे त्यांनी नियम अटी पाळाव्यात नगरपरिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे सांगितले तसेच एक गाव एक गणपती बाबत नगरसेवकांंनी आपल्या प्रभागात जनजागृती करावी सांगीतले

       जवळपास २१ गावांनी एकच गणपती बसवायचा निर्णय घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर शेख महंमद महाराज मंदीरासमोर शहराच्या वतीने एकच गणपती बसवायची सूचना केली त्याला सर्वांनीच मान्यता दिली.

          गणेशोत्सव नियोजन बैठकीला नायब तहसीलदार सायली नंदा,नगरपरिषदेचे अधिकारी पदाधिकारी,माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके,प्रा तुकाराम दरेकर,नगरसेवक संतोष कोथिंबीरे,महेश लांडे,संतोष क्षिरसागर,तालुका विकास अधिकारी प्रशांत काळे व सार्वजनिक गणेशमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News