प्रशासनाच्या नियमांचे पालन न केल्यास मंडळावर होणार कायदेशिर व कठोर कारवाई - स.पो.नि. सोमनाथ लांडे


प्रशासनाच्या नियमांचे पालन न केल्यास मंडळावर होणार कायदेशिर व कठोर कारवाई  - स.पो.नि. सोमनाथ लांडे

एक गाव एक गणपती संकल्पेतुन गणेशोत्सव साजरा करावा 

सुपे प्रतिनिधी / सचिन पवार 

       जगभरासह महाराष्ट्रातही कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा गणेशोत्सव गावांतील मंडळांनी एक गाव एक गणपती अशा साध्या पद्धतीने  साजरा करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही मंडळाने  कसलाही मंडप टाकू नये व कोणत्याही स्पर्धा किंवा गर्दी होईल असे कार्यक्रम आयोजित करू नये असे आव्हाहन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले आहे.

तसेच गणेश उत्सव 2020 साठी खालील महत्त्वाच्या सुचनेनुसार पालन करावे ,

१) धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी झालेले सार्वजनिक गणेश मंडळ यांनाच फक्त ऑनलाईन परवानगी देण्यात येणार आहे ( धर्मादाय आयुक्त यांचेकडील परवाना मागील तीन वर्षांमध्ये नवीन घेतलेला किंवा नूतनीकरण केलेला असावा, २)सार्वजनिक ठिकाणी आणि मंडप स्टेज टाकून गणपती बसवता येणार नाही (मंदिर सभामंडप किंवा मंडळाचे अध्यक्ष यांचे घरी गणेशमुर्ती स्थापना करावी.)

३) गणेश मुर्ती स्थापना किंवा विसर्जनावेळी मिरवणूक काढता येणार नाही,४) सकाळी आणि सायंकाळच्या श्री च्या आरती वेळेस पाच पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही,५) दरवर्षी आम्ही गणपती बसवतो याही वर्षी बसवायचा आहे अशी कारणे चालणार नाही वरील सर्व सूचनांचं तंतोतंत पालन न केल्यास पोलीस कारवाई होणार या संदर्भात स्पष्ट सूचना देण्यात याव्यात,

६) जे गावात कोरोना पेशंट सापडलेने मा.उपविभागीय अधिकारी सो बारामती यांनी कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर केलेले आहे , अशा गावांमध्ये सार्वजनिक गणेशमुर्ती स्थापना करता येणार नाही.

यावेळी,सुपे ,बाबुर्डी ,काळखैरेवाडी ,बोरकरवाडी ,दंडवाडी सह परिसरातील वाडी -वस्तिचे सरपंच , पोलीस पाटील, मंडळाचे अध्यक्ष मान्यवर यांच्या उपस्थित बैठकित एक गाव एक गणपती चा ठरावास सर्वानमते मान्यता देण्यात आली, प्रशासन कोरोना विरोधात पूर्ण क्षमतेने लढत असून यावर्षीचा गणेशोत्सव प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून सर्वांनी साध्या व घरगुती पद्धतीने साजरा करावा  तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई केली जाईल अशी माहीती सोमनाथ लांडे यांनी दिली,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News