वाकी चोपडज रस्त्याची दुरावस्था, जागोजागी खचलाय रस्ता


वाकी चोपडज रस्त्याची दुरावस्था, जागोजागी खचलाय रस्ता

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे)

वाकी चोपडज रस्त्याला खड्ड्याची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या आठवड्यात ऑगस्टमध्ये श्रावणाच्या सरी सारख्या पडत असल्यामुळे रोडवर अक्षरश: मोठमोठाले खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, तसेच या खड्ड्यांमुळे दलदल ही वाढली आहे, त्यामुळे रोड बरोबरच आता नागरिकांचे आरोग्यहीही या खड्ड्यांमुळे धोक्यात आले आहे.

    अनेक वेळा ह्या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी चोपडज येथील उमेश गायकवाड यांनी केली, परंतु डागडुजी करूनही आज जैसे थे परिस्थिती पहावयास मिळत आहे, त्यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळोवेळी रस्त्यासाठी होणाऱ्या लाखो रुपयांचे निधी जर अशाप्रकारे खर्च होत असेल तर, हा जनतेच्या पैशाचा अपव्यय तर होत नाही ना ? असा संशय ही निर्माण होताना दिसत आहे, आणखीन पावसाळ्याचे दोन महिने बाकी असताना ह्या रोडचे काय होईल याचा विचार न केलेलाच बरा. या रोडला साईड पट्टया राहिल्या नाहीत, ठीकठिकाणी काटेरी झुडपे वाढली आहेत. कॉर्नरला समोरून येणारी वाहने दिसत नाहीत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. हा रस्ता जागोजागी खचला असून या रस्त्याचे काम लवकर करण्यात यावे अशी मागणी चोपडज येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News