निमगाव वाघात साध्या पध्दतीने बैलपोळा साजरा


निमगाव वाघात साध्या पध्दतीने बैलपोळा साजरा

बैल मिरवणार्‍या शेतकर्‍यांना रोप देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश...सणावर कोरोनाचे सावट...मिरवणुकांवर विरजण..

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी कोरोना महामारीच्या संकटामुळे निमगाव वाघात साध्या पध्दतीने श्रावणी बैलपोळा साजरा करण्यात आला. सणावर कोरोनाचे सावट असल्याने यावर्षी वाजत-गाजत निघणार्‍या बैलांच्या मिरवणुकांवर विरजण पडले. स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने बैल मिरवणार्‍या शेतकर्‍यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. तर पर्यावरण संवर्धनासाठी दिलेली रोपे शेतीच्या बांधावर लावण्याचे आवाहन करण्यात आले.    

शेतकर्‍यांचे कामधेनू असलेल्या बैलांना आकर्षक सजवून बिरोबाच्या मंदिराच्या दर्शनास आनण्यात आले होते. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी शेतकर्‍यांना रोप भेट दिली. यावेळी बिरोबा देवस्थानचे भगत नामदेव भुसारे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, विजय जाधव, मच्छिंद्र भगत, नवनाथ जाधव, राजू जाधव, दत्ता ठाणगे, ज्ञानदेव फलके, बाळू भूसारे, तुकाराम फलके, प्रमोद जाधव, जालिंदर सुडके, सुनिल चारुडे, पांडूरंग गुंजाळ, विजय भगत, बाबा केदार, अनिल डोंगरे, एकनाथ भुसारे, महेश शेळके, संजय कापसे, रंगनाथ शिंदे आदि उपस्थित होते. 

पै.नाना डोंगरे यांनी पोळा म्हणजे वर्षभर शेतकर्‍यांसाठी राबणार्‍या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मात्र कोरोनामुळे हा दिवस शेतकर्‍यांनी साध्या पध्दतीने साजरा केला. यावर्षी पाऊस असला तरी कोरोनाचे संकट उभे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शेतकर्‍यांना रोपे वाटण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी शेतकर्‍यांनी बिरोबा चरणी प्रार्थना केली.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News