आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन


आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे, 

मोटार वाहन नियम, 1989 चे 54 अन्वये, वाहनाचे आकर्षक नोंदणी क्रमांक शासनाने राखुन ठेवले असून, या क्रमांकासाठी शासनाने ठराविक शुल्क विहीत केलेले आहे. उप प्रादेशिक पविहन कार्यालय, श्रीरामपूर येथे परिवहनेत्तर संवर्गातील खाजगी चारचाकी वाहनांसाठी MH17CM ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. आकर्षक पसंतीचा नोंदणीचा क्रमांक मिळण्याकरिता पुढील कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज व त्या क्रमांकासाठी विहित केलेल्या शासकीय शुल्काचा धनादेश 20 आणि 21 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 10-30 ते 2-30 यादरम्यान कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभाग (खिडकी क्रमांक 15) येथे जमा करणे अनिवार्य राहील.

आकर्षक क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रिय माटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहित केलेल्या अर्जदाराच्या पत्यांच्या पुराव्याची व फोटो पुराव्याची व फोटो ओळखपत्राची (उदा. आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, वीजबिल, घरपट्टी इ.) साक्षांकित प्रत सादर करणे आवश्क आहे. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा, शेड्युल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्ट उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर यांच्या नावे काढून पसंती क्रमांक शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे भरणे आवश्यक आहे. एकदा राखुन ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या संस्थेच्या नावे हस्तांतरित होणार नाही.  विशिष्ट आकर्षक क्रमांक आरक्षित करण्यासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास अशा क्रमांकाची यादी कार्यालयाच्या सुचना फलकावर 24 ऑगस्ट, 2020 रोजी दुपारी 12-00 वा. प्रदर्शित करण्यात येईल. सदरच्या आकर्षक क्रमांकासाठी लिलाव प्रक्रियमध्ये सहभागी होण्यासाठी संबधितांनी 26 ऑगस्ट,2020 रोजी दुपारी 1-00 वा.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात हजर रहावे. लिलावाच्या दिवशी विशिष्ट आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त प्राप्त अर्जदारांनी सदरच्या क्रमांकासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कमेचा धनादेश बंद लिफाफ्यात सोबत घेवून यावेत. सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात अर्जदारांसमक्ष त्यांचे बंद लिफाफे उघडण्यात येतील. त्यापैकी ज्या अर्जदारांचा धनादेश हा जास्त रकमेचा असेल त्या अर्जदारास विशिष्ट आकर्षक क्रमांक बहाल करण्यात येईल. आकर्षक क्रमांकासाठी विहीत केलेल्या शासकीय शुल्काबाबतची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर येथे नोटीस बोर्डावर तसेच खिडकी क्रमांक 31 वर प्रदर्शित करण्यात आलेली आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर अ. अ. खान यांनी प्रसिद्धी प्रत्रकान्वये कळविले आहे.जाहिरात
Search
विडिओ
Recent News