पीपल्स हेल्पलाईनचे कोरोना हरविण्यासाठी कॉन्टम कोरोना पंक्चर कोड मंगळवारी कायदा हरण कोरोना कौरवांना धोत्र्याची फुले वाहून निषेध


पीपल्स हेल्पलाईनचे कोरोना हरविण्यासाठी कॉन्टम कोरोना पंक्चर कोड मंगळवारी कायदा हरण कोरोना कौरवांना धोत्र्याची फुले वाहून निषेध

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - वाढत चाललेला कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरिकांनाच कोरोनाशी लढा देण्यासाठी कोरोना वॉरिअर म्हणून सज्ज करण्याकरिता पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने मंगळवार दि.25 ऑगस्ट रोजी कॉन्टम कोरोना पंक्चर कोड लागू करण्यात येणार आहे. तर टाळेबंदी काळात ज्येष्ठ व्यक्तींना त्रास देणारे, जागा बळकाविणारे व कायदा हातात घेणार्‍या कायदा हरण कोरोना कौरवांना धोत्र्याची फुले वाहून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

हुतात्मा स्मारकात मोजक्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत हे अभियानाचे प्रारंभ करण्यात येणार आहे. तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते वेबीनारच्या माध्यमातून सहभागी होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायद्याचा बडगा न उगारता, नागरिकांनी आपल्या शहाणपणाने कोरोनाला शिकस्त देण्यासाठी जागृक राहण्याची वेळ आली आहे. कोरोनाचे प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सॅनीटायझरचा वापर, गर्दी न करणे, गरजेच्या वेळेस घराबाहेर पडणे आदि नियमांचे पालन करण्याची गरज आहे. मनुष्याने बुध्दीच्या जीवावर अनेक अशक्य गोष्टी शक्य करुन दाखविल्या आहेत. मात्र कोरोना सारखा छोटा विषाणूशी लढा देत असताना मनुष्याने जबाबदारीचे भान ठेऊन त्यावर विजय मिळवणे शक्य असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. महाभारतात द्रोपदीचे वस्त्र हरण होत असताना पीतामह भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण असे अनेक दिग्गज असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. अशाच पध्दतीने काद्याच्या राज्यात कोरोनामुळे न्यायालयच सर्वसामान्यांसाठी बंद झाले असताना कोरोनासूर समाजात पसरले आहे. ज्येष्ठ व्यक्तींना त्रास देणे, जागा बळकावणे आदी कृत्य ते करीत आहे. माणुसकीला काळीमा फासणारे हे कोरोनासूर जीवंत मृतात्मे असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या लढ्यात प्रत्येक मनुष्य उन्नतचेतनेचा अवलंब करुन कोरोना वॉरिअर बनला पाहिजे. तर समाजातील कोरोना कौरवांची नितीमत्ता सुधारण्यासाठी नागरिकांनी देखील त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या अभियानासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, वीरबहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा आदी प्रयत्नशील आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News