विठ्ठल होले पुणे
दौंड प्रतिनिधी -- दौंड तालुक्यातील जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे, 15 गस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दौंड पोलीस स्टेशनला ISO A+ ग्रेड मानांकन मिळाले आहे ते प्रमाणपत्र दौंड पोलीस स्टेशनचे राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी स्वीकारले आहे,त्यामुळे दौंड च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे,पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व निकष पडताळून पाहिल्यानंतर सदरचे मानांकन दिले जाते,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना 2019 मध्ये दौंड पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असताना त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे,आणि त्यांच्या कार्यकाळात दौंड पोलीस स्टेशनला ISO A+ ग्रेड मानांकन मिळाले आहे त्यामुळे सर्व दौंडकर नागरिकांसाठी ही अभिमानाची बाब आहे,त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे,यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप पाटील उपस्थित होते.