ग्रामस्थांच्या मदतीने पकडला काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला धान्याचा टेम्पो


ग्रामस्थांच्या मदतीने पकडला काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला धान्याचा टेम्पो

अंकुश तुपे श्रीगोंद प्रतिनिधी: श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावातील रावसाहेब पवार यांच्या स्वस्त धान्य दुकानातील ८८ गोण्या धान्य एम.एच. १२ एच.डी.२७२७ या आयशर टेम्पो मधून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना गावातील नागरिकांनी रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पकडून बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिला असून पुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन दुकानाचा पंचनामा करून कारवाई सुरू असल्याची माहिती अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी दिली.

रविवारी रात्री ९  वाजण्याच्या सुमारास

येळपणे येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य हे काळ्या बाजारात विक्रीसाठी एम.एच. १२ एच.डी.२७२७ या आयशर टेम्पो मधून जात असताना येळपणे व पिसोरे येथील माजी  जिल्हा परिषद सदस्य अनिल विर, सतीश वीर, उपसरपंच गणेश पवार, दत्तात्रय लकडे यांच्यासह ४ जणांनी पकडून पोलीसांना माहिती देऊन पारगाव येथील टेम्पो चालक महावीर गांधी यांच्यासह ताब्यात दिला.

            घटनेची माहिती मिळताच श्रीगोंद्याच्या अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी पुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पाठऊन दुकानाचा पंचनामा करून कारवाई करत काळ्या बाजारात विक्री साठी जाणारा  ७० गोण्या गहू तसेच १८ गोण्या तांदळा सह आयशर टेम्पो ताब्यात घेतला आहे. या बाबत येळपणे येथील धान्य दुकानदार रावसाहेब पवार तसेच टेम्पो चालक महावीर गांधी व मालक यांच्या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News