श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी १६ वा कोरोना बळी: नवीन २६ रुग्ण पॉझिटिव्ह. तालुक्यात कोरोनाचा कहर


श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी १६ वा कोरोना बळी: नवीन २६ रुग्ण पॉझिटिव्ह. तालुक्यात कोरोनाचा कहर

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी: श्रीगोंदा तालुक्यात सोमवार दि.१७ रोजी १६ व्या कोरोना बळीची नोंद झाली. कोळगाव येथील ५३ वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. श्रीगोंदा येथे उपचार चालू असताना अत्यवस्थ वाटल्याने तीन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यामुळे एकूण बळींची संख्या १६ झाली आहे.

         सोमवारी ७६ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात नवीन २६ रुग्ण संक्रमित सापडले. एकूण संक्रमितांची संख्या ५३० झाली आहे. सोमवारी २० रुग्ण बरे होऊन घरी परतले. एकूण ४६० कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या कोविड केंद्रात ५४ बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत.

     दि.१७ रोजी श्रीगोंदा शहर-०, म्हातारपिंप्री-१, गव्हाणेवाडी-१, काष्टी-४, आनंदवाडी-४, देऊळगाव-२, घारगाव-२, पिंपळगाव पिसा-१,बेलवंडी बुद्रुक-५, कोरेगाव-२,निमगाव खलू-२, पेडगाव-२ असे संक्रमित रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News