नेप्तीत मिशन पॉझिटिव्ह सोच अभियान ग्रामस्थांना सॅनीटायझर व मास्कचे वाटप


नेप्तीत मिशन पॉझिटिव्ह सोच अभियान ग्रामस्थांना सॅनीटायझर व मास्कचे वाटप

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व समाजातील कोरोना काळात निर्माण झालेली नकारात्मक भावना बदलण्यासाठी नेप्ती (ता. नगर) येथे श्री साई संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने मिशन पॉझिटिव्ह सोच अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत गावातील स्वस्त धान्य दुकानात येणार्‍या गरजू ग्रामस्थांना सॅनीटायझर व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.  

श्री साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर यांच्या हस्ते गरजू ग्रामस्थांना सॅनीटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी छबूराव फुले, शांताराम साळवे, एकनाथ होले, रामदास फुले, छबुराव जपकर, दादू चौगुले, बबन कांडेकर, पोपट कोल्हे, बंडू जपकर, सिताराम जपकर, बाबा भोर, राजू भुजबळ, मल्हारी कांडेकर, विठ्ठल चौरे, गजानन होळकर आदि उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची काही लक्षणे दिसल्यास देखील ग्रामस्थ एकमेकांपासून दुरावत आहे. माणसे माणसापासून दुरावत चालली असून, ही नकारात्मकवृत्ती बदलून व शासकीय नियमांचे पालन करुन कोरोनाला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News