पत्रकर विजय केदारे यांच्या वर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध


पत्रकर विजय केदारे यांच्या वर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध

कारवाई करण्याची महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाची मागणी

प्रतिनिधी ,राजेंद्र दूनबळे.

दि.17 ऑगस्ट २०२० महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष विजय केदारे यांच्या निवासस्थानावर समाजकंटकांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश उपाध्यक्ष तथा मंत्रालय विभाग समिती प्रमुख संतोष निकम यांच्या अध्यक्षतेखाली खेरवाडी तालुका निफाड येथे निषेध बैठक घेण्यात आली.  नाशिक जिल्हाअध्यक्ष  संजय दोंदे, उत्तर महाराष्ट्र मुख्य सल्लागार डॉ. राजेश साळुंके, सह संघटक शांताराम दुनबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. पत्रकार प्रेस महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य राजेंद्र दूनबळे यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध करून करवाहीची मागणी केली आहे

महाराष्ट्र राज्यात यापुढे कुठेही व कोणत्याही  पत्रकारांवर हल्ले झाल्यास  पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात येतील तसेच गावगुंडांना सडेतोड उत्तर देण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज व फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर आधारित असलेल्या पुरोगामी पत्रकार महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणार असल्याचे प्रतिपादन प्रदेश उपाध्यक्ष संतोष निकम यांनी केले. राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगत पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने गुन्हेगारी प्रवृत्तीचा जाहीर निषेध जिल्हा अध्यक्ष संजय दोंदे यांनी नोंदवला. प्रास्ताविक राजेंद्र अहिरे यांनी केले. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन समस्याग्रस्त पत्रकारांच्या कुटुंबाची विचारपूस केली. याप्रसंगी  नाशिक शहर प्रसिद्धीप्रमुख रफिक सय्यद , सह संघटक संतोष केंदळे, दिंडोरी तालुका अध्यक्ष सुनील गाडे,उपाध्यक्ष संदीप केंदळे, राजेंद्र आहेर जिल्हा कार्याध्यक्ष विजय केदारे, तलाठी शशिकांत चितळकर, रवींद्र हांडगे सतिष संगमनेरे, उमेश पगारे, नंदु मणियार आदींसह उत्तर महाराष्ट्रातील पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News