मुजोर बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणर नाही !! आमदार आशुतोष काळेंची बँक अधिकाऱ्यांना तंबी !!


मुजोर  बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणर नाही !! आमदार आशुतोष काळेंची बँक अधिकाऱ्यांना तंबी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

राष्ट्रीयकृत व खाजगी बँकेच्या अधिकाऱ्यांना बँक ग्राहकांशी सभ्यतेने वागावे अशा सूचना देतांना आमदार आशुतोष काळे.

 कोपरगाव - बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांशी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी सभ्यतेने वागावे. जे अधिकारी ग्राहकांशी मुजोरपणे वागतील अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी तंबी आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रीयकृत व खाजगी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली.

        राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना, पेन्शन घेण्यासाठी जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना, शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना व बँकेत नियमितपणे व्यवहार ठेवणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी उद्दामपणाची वागणूक देत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत व खाजगी बँकेच्या अधिकाऱ्यांची नुकतीच कोपरगाव येथे बैठक घेवून या बैठकीत या अधिकाऱ्यांचे कान टोचले आहे.

           आज कोरोनामुळे सर्वच घटकांना फटका बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी,छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटक आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे प्रत्येक घटकातील व्यक्ती आपली आर्थिक अडचण भागविण्यासाठी बँकेत येत आहे. त्यांच्या अडचणी समजून घेवून त्यांना मदत करणे हे सर्व बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र काही अधिकारी व कर्मचारी मुद्दामहून ग्राहकांशी उद्दामपणे वागत आहेत.यापुढे अशा तक्रारी आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही अशा कठोर शब्दात कानउघाडनी करून प्रत्येक बँक ग्राहकाशी नम्रतेनेच वागा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकीत राष्ट्रीयकृत व खाजगी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

           यावेळी पंचायत समिती सभापती सौ.पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्माकांत कुदळे,सुनील शिंदे, सचिन रोहमारे,संजय आगवन, विठ्ठलराव आसने,उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,गौतम सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड,नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद,सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे मॅनेजर,अधिकारी,नागरिक आदी उपस्थित होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News