प्रस्तावित समृद्धी सर्कलच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्या -आमदार आशुतोष काळे


प्रस्तावित समृद्धी सर्कलच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्या -आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

           समृद्धी महामार्गावर जेऊर कुंभारी व कोकमठाण परिसरात अहमदनगर-मनमाड राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूंनी होणाऱ्या प्रस्तावित सर्कलसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाला दिल्या आहेत.

- समृद्धी महामार्गावरील प्रस्तावित सर्कलसाठी जमिनी संपादित करण्यात येणाऱ्या कल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत महसूल विभागाला सूचना करतांना आमदार आशुतोष काळे.

              आमदार आशुतोष काळे यांच्याकडे समृद्धी महामार्गावरील जेऊर कुंभारी व कोकमठाण परिसरात होणाऱ्या प्रस्तावित सर्कलसाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या कल्पबाधित शेतकऱ्यांनी अडचणी मांडल्या होत्या. त्याबाबत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे नायब तहसीलदार कोतवाल यांच्या समवेत बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

              जेऊर कुंभारी व कोकमठाण हा परिसर पूर्णपणे बागायती असतांना देखील सात बारा उताऱ्यावर मात्र जिरायती लावण्यात आले आहे.प्रस्तावित सर्कलसाठी ज्यावेळी मोजणी करण्यात आली त्यावेळी सदर शेतामध्ये ऊसाचे पिक होते व आज रोजी त्या शेतात सोयाबीनचे पिक असल्यामुळे जिरायती नोंद न घेता बागायती नोंद घेवून बागायती जमिनीचा दर मिळावा. प्रस्तावित सर्कलसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत व त्या शेतकऱ्यांकडे जे एक ते पाच गुंठे जमीन शिल्लक राहत असले तर ती शेतजमीन देखील खरेदी करावी.जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जोपर्यंत सर्कलचे काम सुरु होत नाही तोपर्यंत संपादित शेत जमिनीमध्ये पिक घेण्यास परवानगी द्यावी आदी अडचणी व मागण्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या होत्या. त्याबाबत प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,नायब तहसीलदार कोतवाल यांना शेतकऱ्यांच्या असलेल्या मागण्या व येत असेलेल्या अडचणी लवकरात लवकर दूर करून  शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे योग्य मूल्य प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना तातडीने मिळावे यासाठी प्रयत्न करावे.समृद्धी सर्कल जेऊर कुंभारी व कोकमठाण या परिसरात नगर मनमाड राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूंनी होणार आहे त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांचे किती क्षेत्र जाणार व कुठले जाणार याची माहिती द्यावी व सर्वच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून द्यावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्या.

     या बैठकीसाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार कोतवाल, तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते, जिनिंग प्रेसिंगचे संचालक सचिन आव्हाड,गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, सुनील बोरा,वसंतराव आव्हाड, रामनाथ आव्हाड,विजय रोहोम, डॉ.यशराज महानुभाव डॉ. ओंकार जोशी आदींसह प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News