झाडांचे संगोपन करून परिसर निसर्गसंपन्न करा- आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन


झाडांचे संगोपन करून परिसर निसर्गसंपन्न करा- आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन

स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) - प्रत्येक जबाबदार नागरिकाने निसर्गाची जपणूक करताना जास्तीत जास्त पर्यावरणपूरक झाडे लावून निसर्गाचा समतोल राखण्यास हातभार लावावा. झाडांचे संगोपन करून परिसर निसर्गसंपन्न करावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्कूलचे संस्थापक बाळासाहेब खोमणे,महेश झोडगे,सुरेश बनसोडे,आरिफभाई शेख,अभिजीत खोसे,हेमंत ढाकेफळकर आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्यासाठी चांगल्या पर्यावरण आवश्यकता आहे. जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, पाणीटंचाई आदी समस्यांवर मात करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले पाहिजे.

स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, वृक्षांना कुटुंबातील सदस्य मानून त्यांची देखभाल करणे गरजेचे आहे. केवळ वृक्षारोपण करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही तर त्यांचे संगोपन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News