नेवासा रोड ची झाली चाळणी


नेवासा रोड ची झाली चाळणी

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव शहरांमधून नेवासा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळणी झाल्याचे दिसत आहे, ऑगस्टमध्ये श्रावणाच्या सरी गेल्या दोन-तीन दिवसापासून सारख्या पडत असल्यामुळे शहरातील नेवासा रोडवर अक्षरशहा मोठ मोठाले खड्डे पडल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, तसेच या खड्ड्यांमुळे दलदल ही वाढली आहे, त्यामुळे रोड बरोबरच आता नागरिकांचे आरोग्यही ही या खड्ड्यांमुळे धोक्यात आले आहे,

     अनेक वेळा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक संघटनांनी व राजकीय संघटनांनी अनेक वेळा ह्या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी वेळोवेळी केली होती, परंतु डागडुजी करूनही आज जैसे थे परिस्थिती पहावयास मिळात आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, वेळोवेळी रस्त्यासाठी होणारा लाखो रुपयांचा निधी जर अशाप्रकारे खर्च होत असेल तर, हा जनतेच्या पैशाचा अपव्यय होत तर नाही ना ? असा संशय ही निर्माण होताना दिसत आहे, आणखीन पावसाळ्याचे दोन महिने बाकी असताना ह्या रोड काय होईल याचा विचार न केलेलाच बरा 

पाठीमागे एका मद्य धुंद ट्रकचालकाने डिस्कवर ट्रक चालवत आणल्यामुळे डांबरी रोडचे क्र्याचेस गेले होते, त्याच वेळेस आमच्या प्रतिनिधी ने  या  पावसाळ्यात रोड खराब होण्याची शक्यता वर्तविली होती, परंतु अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करुन ट्रक चालकावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही, या क्र्याचेसचे ला आता हळूहळू मोठाले खड्ड्यात रूपांतर होताना दिसत आहे, आता तरी अधिकारी याकडे लक्ष देतील का असा प्रश्न आता नागरिक करत आहेत...

जाहिरात
Search
विडिओ
Recent News