पळशी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


पळशी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बारामती :प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील पळशी याठिकाणी 74 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पळशी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण पोलीस नवनाथ नानवर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेविका या कोरोना योद्ध्यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. यावेळी सरपंच बाबासाहेब चोरमले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

       यावेळी जगभरामध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नियमाप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी, करेवस्ती तसेच अनंतराव पवार माध्यमिक विद्यालय पळशी येथेही विद्यार्थ्यांविना प्रथमच ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला. करेवस्ती शाळेतील कार्यक्रमासाठी पळशी गावच्या सदस्या ललिता हाके, संपत गरदडे,  शिक्षकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News