अहमदनगर शहरातील मानाचे गणेश उत्सव विना मंडप DYSP संदिप मिटके यांची शिष्टाईला यश


अहमदनगर शहरातील मानाचे गणेश उत्सव विना मंडप  DYSP संदिप मिटके यांची शिष्टाईला यश

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगर शहरातील ग्राम दैवत श्री.विशाल गणपती मंदिर, माळीवाडा  येथील बैठकीत एकमताने निर्णय

दिनांक १०/०८/२०२० रोजी कोतवाली पोलिस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत अहमदनगर शहरातील मानाचे श्री.गणेश उत्सव साधे पणाने व विना मंडप साजरे करण्या बाबत DYSP श्री. संदिप मिटके यांनी आव्हान केले होते.

त्या अनुषंगाने आज दिनांक १६/०८/२०२० रोजी  नगर शहरातील ग्राम दैवत श्री.विशाल गणपती मंदिर, माळीवाडा  अहमदनगर येथे येथे अहमदनगर शहरातील मानाच्या श्री.गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री आगरकर,  ऋषिकेश कावरे, निलेश खरपुडे, गणेश हूच्चे ,सुनील जाधव, अनिल हुमने, मनीष साठे,रवींद्र जपे, स्वप्नील घुले,शिवाजी कदम, बाळासाहेब बोराटे, विशाल भागानगरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील माना चे श्री.गणेश उत्सव साधे पणाने, विना मंडप व कोरो ना संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने प्रशासनाने दिलेल्या सर्व आदेशा प्रमाणे करण्याचे एक मताने निर्णय घेण्यात आला आहे.....

जाहिरात
Search
विडिओ
Recent News