लाल परी पुन्हा धावणार! कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरू होण्याचे संकेत


लाल परी पुन्हा धावणार! कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरू होण्याचे संकेत

काकासाहेब मांढरे

 इंदापूर प्रतिनिधी: मिशन बिगीन अंतर्गत राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद असलेली लाल परी लवकरंच रस्त्यावरून धावताना दिसेल. एसटी शिवाय कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्याचे संकेतही वडेट्टीवार यांनी दिले आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, आता पाच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे राज्यातही लवकरच आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  आवश्यक त्या सर्व नियमांचे पालन करून एस.टी. सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यात सेवा सुरु होईल असे संकेतही वडेट्टीवार यांनी दिले आहेत. यापुर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवा आणि जिल्हाअंतर्गत एसटी सेवा सुरु होत्या.

मात्र एसटी सेवा पुन्हा सुरु झाल्या तरी एका एसटी बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मिशन बिगीन अंतर्गत अनेक सेवा, उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.कोरोनाच्या काळातही एसटीने जिल्हाअंतर्गत 50 टक्के बस सेवा सुरु केली होती. मात्र, प्रवाशांनी या सेवेला म्हणावा असा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रवासी उत्पन्नापेक्षा डिझेलचा खर्च जास्त झाल्याचे चित्र आढळून आले होते. मात्र एस.टी. सेवा ठप्प असल्यामुळे वाढता तोटा बघता आता सेवा सुरु करणे आवश्यक असल्याचे मत अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. मिशन बिगीन अंतर्गत इतर सर्व सेवा हळूहळू सुरु असतांना, सर्वसामाना प्रवासासाठी एसटी सेवेची गरज भासणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News