पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या हस्ते कोतवाली चे सतिश शिरसाठ यांना सन्मानित


पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या हस्ते कोतवाली चे सतिश शिरसाठ यांना सन्मानित

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ साहेब यांना गडचिरोली येथे नक्षलविरोधी उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल आज पोलिस अतंरिक सुरक्षा सेवा पदक  मा. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या हस्ते 15 अॉगस्ट स्वतंत्र दिना निमित्त कोतवाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतिश शिरसाठ यांना सन्मानित केले.

कोतवाली पोलीस ठाण्याचे सतिश शिरसाठ हे 2013 ते 2017 या कालावधीत गडचिरोली येथे कार्यरत होते. या काळ्यात त्यांनी नक्षल विरोधी राबविण्यात येणाऱ्या सी 60 या पथकात कर्तव्य निभावले आपल्या कार्यकाळात सतिश शिरसाठ यांना सात वेळा नक्षल्यांच्या गोळीबाराचा सामना करावा लागला होता. तसेच सी 60 ने केलेल्या धडक कारवाईमुळे सात नक्षलवाद्यांनी पोलीसासमोर आत्मासपॅण केले होते. या मोहिमेत उपनि सतिश शिरसाठ यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली होती. या कामगिरीसाठी उपनिरीक्षक शिरसाठ यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कौतुक केले आहे. 

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News