गणेशोत्सव विधायक उपक्रमातून साजरा करावा -स्वप्निल घोगडे


गणेशोत्सव विधायक उपक्रमातून साजरा करावा -स्वप्निल घोगडे

संभाजी गोसावी कोरेगाव. प्रतिनिधी.

कोरेगांव -कोरेना वायरसच्या वाढत्या महामारीत सुमूह संसर्ग टाळण्यांसाठी वाठार परीसरातील तसेच पोलिस स्टेशनच्या हदीतील गणेश मंडळानी एक गाव एक गणपती बसवुन साध्या पदूधतीने हा उत्सव साजरा करुन प्रशासनांस सहकार्य करावे असे आवाहन वाठार पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस स्वप्निल घोगडे यांनी केले आहे.

दरवर्षी संपूर्ण देशभरात गणपती उत्सव हा मोठया थाटामाटात साजरा केला जातो.गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या दहा दिवसात वेगवेगळी सामाजिक तसेच सांस्कृतीक उपक्रम राबविले जातात. लहान मुले तसेच थोरा मोठया पर्यंत सर्वजण एकत्र येउन हा उत्सव साजरा केला जातो.

परंतु गेल्या सहा महीन्यापासुन कोरोनाचा वाढता संसर्ग बघता समुह संसर्गाचा वाढता धोका बघता सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा शासनाचा निर्णय असल्याने गणेश उत्सवाचा या दहा दिवसाचा कालावधित सदर गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती हि संकल्पना राबवुन समस्त मानवजातीला कोरोना संकटापासुन दुर ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन

कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोगडे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News