गोकूळनगरी पूलाचे काम झाले पूर्ण...!!


गोकूळनगरी पूलाचे काम झाले पूर्ण...!!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील गोकुळनगरी परिसरातील पुलावरून शहरासह ग्रामीण भागातील येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी वर्दळ असते.शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या कार्यकाळात शासन दरबारी पाठपुरावा करून जिल्हा नियोजन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ३७ लाख रुपये खर्चाच्या कामाला मंजुरी आणली व सदर पुलाचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे...!!

    गत काळात शहरात आलेल्या पूरपरिस्थिती दरम्यान महत्वाचा ठरणारा गोकुळनगरी पूल कमी उंचीचा असल्यामुळे पाण्याखाली गेला होता,त्यावेळी शहराशी नागरिकांचा संपर्क तुटला गेला होता त्या वेळी पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या तत्कालीन जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व भारतीय जनता पार्टी चे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे साहेब यांच्या ही बाब सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी लक्षात आणून दिली त्या वेळी तातडीने या कामासाठी जिल्हा नियोजन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ३७ लाख रुपये निधी त्यांनी उपलब्ध करून दिला व हा महत्वपूर्ण पूल आता पूर्ण झाला असून कोपरगावकरांच्या उपयोगी पडणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News