श्रीगोंदा तालुक्यात १५ वा कोरोना बळी: नवीन १६ रुग्ण संक्रमित


श्रीगोंदा तालुक्यात १५ वा कोरोना बळी: नवीन १६ रुग्ण संक्रमित

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी १५ वा कोरोना मृत्यू झाला.आनंदवाडी येथील ७५ वर्षीय संक्रमित महिला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू पावली.शनिवारी ९४ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात नवीन १६ रुग्णांची भर पडल्याने एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ४८६ झाली आहे. तर १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण बरे झालेल्यांची संख्या ४३१ झाली आहे. तर ४० रुग्ण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत.

       उल्लेखनीय दिलासादायक गोष्ट म्हणजे मोठ्या लोकवस्तीच्या श्रीगोंदा शहरात रुग्ण सापडण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. शहर परिसरातील लांडगेवाडी येथे १ रुग्ण पॉझिटिव्ह आला. तर ग्रामीण भागात वांगदरी-१,मढेवडगाव-१, श्रीगोंदा कारखाना-१, निमगाव खलू-३, काष्टी-१, एरंडोली-२, राजापूर-२,भिंगाण-१, पिंप्री कोलंदर-१, देवदैठण-२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News