15 ऑगस्ट दिनी जनकल्याण रक्तपेढीत 51 जणांनी रक्तदान केले


15 ऑगस्ट दिनी जनकल्याण रक्तपेढीत 51 जणांनी रक्तदान केले

पुणे-  परिषद ,स्वारगेट,मुकुंद नगर व सुशिलाबेन मोतीलाल शहा ट्रस्ट तर्फे दरवर्षी प्रमाणे 15 ऑगस्ट 20 रोजी स्वारगेट येथील जनकल्याण रक्तपेढीत 74 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त 51 जणांनी रक्तदान केले.या मध्ये संस्थेचे  सुविधा नाईक,रघुनाथ ढोक,अतुल सलगरे,आकाश ढोक,दीपक गुंदेचा,किरण त्रिवेदी यांनी आवर्जून रक्तदान केले.यावेळी अध्यक्ष चंद्रकांत दर्डा,संजय कटारिया,सुनील मोतीलाल शहा,राजेंद्र चंगेडिया,रेखा आखाडे,माणिकलाल बाहेती,शैलेश शहा,शालमली बेल्हेकर,रोहिणी जोशी,रोहिणी पाटील उपस्थित होते.

यावेळी सर्वाना मास्क,पेन,बिस्किटे, केळी आणि रक्तपेढी तर्फे गौरवपत्र देण्यात आले.यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे अतुल कुलकर्णी , डॉ.तन्वी यार्दी  व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी फिजिकल डिस्टन्स पाळत मौलिक मदत केली तर फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष रघुनाथ ढोक, सुविधा नाईक किरण त्रिवेदी, आकाश ढोक ,अतुल सलगरे , रेखा आखाडे यांनी संयोजनात मोठी मदत केली.डॉ.कुलकर्णी व त्यांचे सहकारी म्हणाले की आता खरी जास्त रक्तदाते बरोबर  कोव्हिडं चे पेंशटसाठी प्लाझ्मा रक्तदाते ची जास्त आवश्यकता आहे.दरवर्षी भारत विकास परिषद व सुशीलाबेन मोतीलाल शहा ट्रस्ट रक्तदान घेतात पण यावेळी कोरोना मुळे रक्तदान कमी झाले असले तरी रक्तदान हे श्रेष्ठदान  समजुन रक्तदाते  स्वतः हुन पुढे आले पाहिजेत ही काळाची गरज आहे. तर रघुनाथ ढोक म्हणाले की यापुढे सत्यशोधक विवाह प्रसंगी  वधु वर आणि त्यांचे नातेवाईक यांनी रक्तदान जीवनदान , रक्तदान पुण्यदान समजून पहिले रक्तदान करूनच विवाह लावावेत यासाठी प्रबोधन करणार असल्याचे म्हंटले तर सर्वांचे आभार अध्यक्ष चंद्रकांत दर्डा यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News