कोरोनाला रोखण्यात योगदान देणाऱ्या कोरोना योद्धयांचे योगदान कोपरगावकर कधीही विसरू शकत नाही !!-आमदार आशुतोष काळे


कोरोनाला रोखण्यात योगदान देणाऱ्या कोरोना योद्धयांचे  योगदान कोपरगावकर कधीही विसरू शकत नाही !!-आमदार आशुतोष काळे

७४ व्या  स्वातंत्र्यदिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान करतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी डॉक्टर्स, पोलीस प्रशासन,आरोग्य सेविका,आशा सेविका,नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी,महसूल कर्मचारी तसेच सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य अजोड असून कोरोनाला रोखण्यात कोरोना योद्धयांनी दिलेले योगदान कोपरगावकर कधीही विसरू शकत नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले

               ७४ व्या  स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसील कार्यालय कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ.पौर्णिमाताई जगधने, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते तसेच सर्व समानार्थी कोरोना योद्धे उपस्थित होते.सर्व सन्मानार्थी कोरोना योद्धयांचा आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

         पुढे बोलतांना ते म्हणाले की,कोरोना व्हायरसच्या जागतिक महामारीचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे आरोग्य अबाधित राहणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी प्रशासनाला आवश्यक असणाऱ्या सर्व संरक्षक साहित्याची वेळेत उपलब्धतता करून दिली.लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कोरोना योद्धयांनी कोपरगाव तालुक्याला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस न थकता काम करीत आहे. त्यांनी घेतलेले कष्ट व केलेल्या अपार मेहनतीमुळे कोपरगाव तालुक्याला निश्चितपणे काही अंशी नियंत्रनात ठेऊ शकलो आहे. प्रशासनाच्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेलं योगदान व केलेल्या त्यागाबद्दल कोपरगावकरांना उतराई होणे शक्य नसले तरी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.सर्व नागरिकांप्रमाणे सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले.तत्पूर्वी स्वातंत्र्यदिनानिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

                यावेळी गौतम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शिरीष लोहकणे,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,बाळासाहेब कडू, बाळासाहेब रुईकर,अंबादास वडांगळे,विजय चवंडके, बाळासाहेब देवकर आदी उपस्थित होते.


       


                          .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News