गोकुळनगरी पुलाचे आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते लोकार्पण !!


गोकुळनगरी पुलाचे आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते लोकार्पण !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

              कोपरगाव शहरातील नागरिकांना अतिशय महत्वाच्या असणाऱ्या खंदकनाल्यावरील गोकुळनगरी पुलाचे ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले असून वाहतुकीसाठी हा पूल खुला करण्यात आला आहे.

७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर गोकुळनगरी पुलाचे लोकार्पण करतांना आमदार आशुतोष काळे

     कोपरगाव शहरातील नागरिकांना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना कोपरगाव शहरात प्रवेश करण्यासाठी खंदकनाल्यावरील गोकुळनगरी पुलावरून ये-जा करणे सोयीचे होते. मात्र पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर आल्यानंतर गोकुळनगरी पूल पाण्याखाली जावून कोपरगाव शहरातून बाहेर व कोपरगाव शहरात नागरिकांना प्रवेश करता येत नसे. मात्र आता यापुढे गोकुळनगरी पुलाची उंची वाढल्यामुळे यापुढे नागरिकांना अडचण येणार नाही. सध्या सुरु असलेला पावसाळा व गोदावरी नदी दुधडी भरून वाहत असतांना आमदार आशुतोष काळे यांनी स्वातंत्र्यदिनी हा पूल सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केला असून त्याबद्दल नागरिकांनी आभार मानले आहे.

                  यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे, हिरामण गंगूले,राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख,अशोक आव्हाटे, दिनकर खरे,राजेंद्र आभाळे, राजेंद्र जोशी,प्रशांत वाबळे, अंबादास वडांगळे,चंद्रशेखर म्हस्के,जावेद शेख,सलीम पठाण, मुकुंद इंगळे,कैलास भुतडा,मुकुंद भुतडा,संतोष टोरपे,प्रकाश दुशिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे,मुंदडा आदी उपस्थित होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News