वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा


वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजाचे ध्वजारोहन नितिन गायकवाड याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  कोविड योद्धा काॅन्सटेबल माधुरी खोमणे यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीला 30 वृक्ष भेट  देण्या आले. या  कार्यक्रमासाठी वडगाव निंबाळकरच्या सरपंच आकांक्षा शिंदे, उपसरपंच माणिक गायकवाड,  ग्रामसेवक शाहनुर शेख, बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै. नानासाहेब मदने, तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड,  रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अध्यक्ष कांचन काटे, उपध्याक्ष माधव काटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रध्दा म्हसकर यांनी तर आभार प्रेम चव्हाण, अर्चना गायकवाड यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News