लोकशाहीची अडवणूक करू नका. उपनगराध्यक्ष पदाची निवडणुकीबाबत .तारीख लवकर काढू


लोकशाहीची अडवणूक करू नका. उपनगराध्यक्ष पदाची निवडणुकीबाबत .तारीख लवकर काढू

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी :

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड होण्यासाठी भाजपाच्या  आज चार नगरसेवकांकडून  १५ ऑगस्ट दिनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते मात्र प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांना सविस्तर अहवाल पाठवून उपनगराध्यक्ष पदाची निवडणुकीबाबत तारीख लवकरच काढू असे आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते नगरसेवकांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले. 

श्रीगोंदा नगरपालिकेचे  उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी ९ जून २०२० रोजी राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्ष पद २ महिन्यापासून रिक्त आहे.सद्या कोविड- १९ चे कारण देत जिल्हाधिकारी, अहमदनगर हे पक्षपातीपणा व जाणून बुजून निवड करण्याबात अडथळा आणत आहेत. मात्र या कोविड- १९ च्या काळात जिल्ह्यासह राज्यात सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती निवडी, अहमदनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य निवडी, पुणे, नाशिक जिल्हयातील उपनगरध्यक्ष निवडी जुलै व ऑगस्ट महिन्यात केल्या गेल्या ,फक्त श्रीगोंदा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीला कोरोना आडवा   येतो असे माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी सांगितले. 

श्रीगोंदा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडीची तारीख लवकर काढण्यात यावी या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस, संग्राम घोडके व रमेश लाढाणे यांनी आमरण उपोषण सुरु केले होते  मात्र प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार व आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आले. 

लोकशाहीची अडवणूक करू नका :- आमदार बबनराव पाचपुते 

श्रीगोंदा उपनगराध्यक्ष निवडीबाबत दि.१४ ऑगस्ट २०२० रोजी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ  व जिल्हाधिकारी यांची पाचपुते यांनी नगरसेवकांसह  अहमदनगर येथे भेट घेऊन या निवडीबाबत राजकारण न आणता लोकशाहीची अडवणूक न करता निवडीची तारीख निश्चित करावी.यावर पालकमंत्री यांनी सांगितले की, माझ्या जिल्ह्यातही कोविड- १९ च्या काळात निवडणुका पार पडलेल्या आहेत.त्यामुळे सदरची निवडणूक लवकरात लवकर घेणेबाबत संबंधितांना आदेश देतो.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News