रयत मध्ये महिलांच्या हस्ते ध्वजारोहण


रयत मध्ये महिलांच्या हस्ते ध्वजारोहण

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी:

रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा शहरातील सर्व संकुलामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात तसेच एका अभिनव प्रयोगाने साजरा करण्यात आला. तीनही शाखांमध्ये ध्वजारोहण महिला शिक्षिकांच्या हस्ते करून अनोखी मानवंदना देण्यात आली .श्रीगोंदा शहरामध्ये सर्वात मोठे विद्यालय म्हणून महादजी शिंदे विद्यालयाचा नावलौकिक आहे. यावेळी ध्वजारोहण विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. कुंदा निद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका सौ वंदना नगरे यांच्या हस्ते करण्यात आले.अल्पावधित नावारुपाला आलेल्या महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल चे ध्वजारोहण ज्येष्ठ शिक्षिका सौ मिना लवांडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्राचार्य तुकाराम कन्हेरकर, उपमुख्याध्यापिका सौ.चौधरी, पर्यवेक्षक उत्तम बुधवंत व दिलीप भुजबळ, जेष्ठ शिक्षक वसंत दरेकर, विलास दरेकर, संतोष शिंदे, गुरुकुलप्रमुख विलास लबडे व राजेंद्र खेडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल दरेकर व सचिन झगडे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News