जिनिंग -प्रेसिग सोसायटीच्या उपाध्यक्षपदी गणेश गायकवाड


जिनिंग -प्रेसिग सोसायटीच्या उपाध्यक्षपदी गणेश गायकवाड

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष भाऊसाहेब देवकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर गणेश शंकरराव गायकवाड यांची  नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. 

आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा पार पडली.सदरच्या सभेत गणेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी  नवनिर्वाचित उपाध्यक्ष गणेश गायकवाड यांचा आमदार आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गणेश गायकवाड यांनी आपल्या निवडी बद्दल आभार व्यक्त करतांना ते म्हणाले की, स्व.माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सुरु केलेली कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या शिखरावर आहे.अशा प्रगतीपथावर असलेल्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करून टाकलेला विश्वास व सोपविलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे  त्यांनी आपल्या मनोदयात सांगितले.

       यावेळी कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,मावळते उपाध्यक्ष भाऊसाहेब देवकर,संचालक कचेश्वर डुबे,बशीर शेख, बाबासाहेब औताडे,भाऊसाहेब देवकर,सुदाम लोंढे,किसन आहेर. सचिन आव्हाड,सौ.चंद्रमा जगताप.सौ.विठाबाई वारकर,. शिवाजीराव वाबळे,केरु पगारे,राऊसाहेब मोरे,जनरल मॅनेजर सुरेश काशिद आदी मान्यवर उपस्थित होते.    
जाहिरात
Search
विडिओ
Recent News