स्मितल वाबळे यांना युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष करा- श्रीगोंदा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मागणी.


स्मितल वाबळे यांना युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष करा- श्रीगोंदा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मागणी.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि. मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील  सुपुत्र स्मितल वाबळे हे महाविद्यालयीन जीवनापासून काँग्रेसी विचारसरणीच्या विविध संघटसनांमध्ये कार्यरत आहेत. २००५ सालापासून एन.एस.यु.आय व युवक काँग्रेसच्या माध्यमातुन पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी व काँग्रेस पक्षाचे नीती, मूल्य, आर्थिक, औद्योगिक, परराष्ट्र धोरण, गरिबी हटाव,कल्याणकारी योजना  तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी धडाडीने प्रामाणिक काम केले आहे. वाबळे यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना न्याय द्यावा व पक्षवाढीसाठी त्यांना चांगली संधी देऊन त्यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करावी अशा मागणीचे निवेदन  श्रीगोंदा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने राज्याचे महसुल मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेबांना यांना दिले.

            महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अहमदनगर येथे युवक काँग्रेस व विद्यार्थी संघटनांच्या बैठकीला आले होते.यावेळी हे निवेदन विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आदिल शेख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष धिरज खेतमाळीस, प्रभारीआदेश शेंडगे,युवक शहराध्यक्ष योगेश मेहेत्रे यांनी दिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News