सख्या धाकट्या भावांनेच थोरल्या भावाला पेट्रोल टाकुन जिंवत जाळले


सख्या धाकट्या भावांनेच थोरल्या भावाला पेट्रोल टाकुन जिंवत जाळले

( आग विझविताना पत्नी ही झाली जखमी, उपचारा दरम्यान भावाचा मृत्यू)

बारामती सुपे प्रतिनिधी / 

           येथील वेगेळे राहण्याच्या कारणावरून सख्या धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्याचा संतापजनक प्रकार बारामती तालुक्यातील सुपे गावानजीक काळखैरेवाडी  राजबाग याठिकाणी घडला आहे.

     मारुती वसंत भोंडवे  वय.48 असे या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ अनिल वसंत भोंडवे वय. 32 याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. बुधवार दिनांक 12 रोजी रात्री साडे अकरा च्या दरम्यान घडली आहे.

    याबाबत ची माहिती अशी की परिसरातील राजबाग परिसरात दोघेही भाऊ एकत्र राहतात. मारुती भोंडवे यांच्यासह पत्नी सविता मुलगा महेश व हर्षद असे या घरात झोपले असताना आरोपी अनिल घराजवळ येऊन मारुती भोंडवे यांना म्हणाला, तू वेगळे रहा, आमच्यात राहू नकोस असे म्हणत त्याने घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या, घराच्या दाराची बाहेरून कडी लावत थोरले भाऊ मारुती यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने खिडकीतून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी     मारुती यांच्या अंगावरील पेटलेले कपडे विझवण्यासाठी  पत्नी सविता त्याठिकाणी आल्या,  त्यांनाही ठीक ठिकाणी भाजले आहे. त्यांचा आरडाओरडा ऐकून इतरांच्या मदतीने मारुती यांना दवाखान्यात दाखल केले . ते गंभीररीत्या भाजल्याने  त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी दिनांक 13 रोजी त्यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला. या जबाबानंतर मारुती भोंडवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे बारामती तालुका सह परिसरातून संताप व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.वेगळे राहण्याचा कारणावरून सख्ख्या भावाला पेटवून देऊन ठार केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात प्रथमच घडल्याने सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News