गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी दिले गाढवाच्या पिल्लाला जीवदान..


गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी दिले गाढवाच्या पिल्लाला जीवदान..

संजय भारतीकोपरगाव प्रतिनिधी. 

 बॅडमिंटन खेळून सकाळी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे घरी येत असताना के जे सोमैया कॉलेज च्या समोर एक गाढवाचे पिल्लू जीवाच्या अंकाताने ओरडत असलेले त्यांच्या निर्दशनास आले नेहमीच समाजसेवीची उर्जा अंगात असलेल्या मुळे आदिनाथ ढाकणे यांनी क्षणाचाही विलंब न करता काही तरूणांना मदतीसाठी बोलावून गाढवाच्या पिल्लाला बजरंगबली हनुमान मं मंदिराजवळ गोदाकाठी आणले.त्याला जवळून पाहिले  तेंव्हा लक्षात आले की त्याला कुत्र्यांनी चावले होते.अंगावर भर पुर जखमा झाल्या होत्या.व त्या जखमामध्ये किडे पडलेले होते. वेळीच उपचार भेटला नाही तर हे गाढवाचे पिल्लू जिवाला मुकणार हे लक्षात आल्यानंतर मग ढाकणे यांनी पशुवैद्यकीय डॉ रमेश भाबड यांना फोन करून उपचारासाठी बोलावून घेतले. तात्काळ डॉ भाबड यांनी आपला अनुभव मार्गी लावत त्यांच्यावर उपचार केले.उपचाराला साथ भेटली अन् गाढवाच्या पिल्लाला जीवदान मिळाले. जीवदान मिळतात हे गाढवाचे पिल्लू आपल्या आईच्या कुशीत जाऊन बसले.माणसाप्रमाणेच प्राण्यांवरही प्रेम करावे असे आवाहन गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी केले.क्षणभर का होईना गाढवाच्या पिल्लाला जीवदान देताना पैठणचे संत एकनाथ महाराज यांची आठवण झाली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News