विठ्ठल होले पुणे
प्रशासन आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांचा बैठकीत एकमुखी निर्णय
वेल्हा प्रतिनिधी -- कोविड 19 प्रादुर्भावामुळे *गणेश उत्सव २०२० च्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांची बैठक आज दिनांक १४-८-२०२० रोजी सकाळी ११:०० ते १२:३० यावेळेमध्ये गोरक्ष मंगलकार्यालय वेल्हे येथे संपन्न झाली. सदर बैठकी करता मा. श्री. शिवाजी शिंदे, तहसिलदार वेल्हे, श्री. आंबादास देवकर, तालुका वैद्यकीय अधिकारी व श्री. विनायक देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वेल्हे पोलीस स्टेशन असे पदाधिकारी व पोलीस पाटील व गणपती मंडळाचे पदाधिकारी असे १२५ ते १३० जनसमुदाय उपस्थित होता.* *प्रथमता कोवीड-१९ चे अनुषंगाने यावर्षी गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा याबाबत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक सार्वजनिक गणेशोत्सव २०२० मार्गदर्शक सूचनांची माहिती देऊन त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. *तसेच वैद्यकीय अधिकारी यानी वेल्हे तालुक्यामधील कोरोनाची परिस्थितीबाबत माहिती देऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकराता सर्वानी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.*तसेच मा. श्री. शिवाजी शिदें तहसिलदार, वेल्हे व श्री. विनायक देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वेल्हे पोलीस स्टेशन यांनी यावर्षी सार्वजनिक गणपती उत्सव साजरा न करण्याबाबत गणपती मंडळाना आव्हान केले असता, गणपती मंडळानी त्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन चालू वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता प्रतिकात्मक गणपती उत्सव साजरा करण्याचे सर्वांनी एकमताने सांगीतले. त्यामूळे यावर्षी वेल्हे तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणपतीच्या लहान मुर्तीची स्थापना मंदीरामध्ये करण्याचे सर्वानी एकमताने निर्णय घेतला त्याचे स्वागत करण्यात आले.
वेल्हे तालुक्यामध्ये खालीलप्रमाणे गणपती उत्सव साजरा होणार
*१) सार्वजनिक ठिकाणी, रोडवर अथवा इतर कोणत्याही ठिकाणी मंडप/स्टेजची उभारणी केली जाणार नाही.*
*२) कोणतेही देखावे अथवा मनोरंजनाचे कार्यक्रम केले जाणार नाहीत जेणेकरून गर्दी होणार नाही.*
*३) गणपतीचे आगमण व विसर्जनाचे वेळी मिरवणूक काढली जाणार नाही. तसेच कोणतेही वाद्य वाजवले जानार नाही.*
*४) घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन करताना सर्वांना एकत्रित विसर्जन कराता येणार नाही. केवळ घरातील २ व्यक्तीनी ( १० वर्षाखालील मुले व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक सहभागी होऊ शकणार नाहीत ) गर्दी न करता घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन करावे.*
*५) गणपतीची आरती करण्याकरता जास्तीत जास्त ४ व्यक्ती एकत्रीत येऊ शकतात. त्यानी मास्क वापरणे व सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे आवश्यक आहे.*
*६) गणपती उत्सवाच्या अनुषंगाने भजन, कीर्तन अथवा देखावे सादरीकरण अशा प्रकारचे कोणत्याही कार्यक्रम करता येणार नाहीत.*
*७) घरगुती गैरीचे आगमन व विसर्जन करतेवेळी गर्दी करु नये. तसेच झिम्मा फुगडी, हळदी कुंकू यासारखे कार्यक्रमाचे आयोजन करु नये.*
*८) गणपती उत्सव काळामध्ये सर्व नागरिकांनी मास्क व सॅनीटायझरचा वापर करुन, सोशल डिस्टंसिंग व शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.*
*९) प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे सर्व गणेश मंडळे तसेच नागरिक आणि पालन करावे.*
*१०) प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये गणपती उत्सव साजरा करत असताना शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून करावे.**वेल्हे तालुकामधील सर्व नागरिक व गणपती उत्सव मंडळ यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चालू वर्षाचा गणपती उत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात आपल्या घरीच साजरा करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे सर्वांनी एकमताने मान्य केले,असल्याचे स पो नि विनायक देवकर यांनी सांगितले.